शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या महाराष्ट्राची माफी मागावी, महाविकास आघाडीने नोंदविला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:41 IST

Wardha : छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. मोठ्या थाटात अनावरणही करण्यात आले. परंतु अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्याने जनभावना उफाळून आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा देऊन महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी निषेध आंदोलनातून केली आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस आणि शरद पवार गटाच्यावतीने वेगवेगळे आंदोलन करून या घटनेचा निषेध नोदविला. काँग्रेसच्यावतीने केलेल्या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, शेखर शेंडे, पांडुरंग देशमुख, सुरेश ठाकरे, डॉ. अभ्युदय मेघे, डॉ. सचिन पावडे यांच्यासह महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तर शरद पवार गटाच्यावतीने केलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष संदीप किटे, जिल्हाध्यक्ष प्रणय कदम, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, प्रा. खालील खतीब, शहराध्यक्ष मुन्ना झाडे, संदीप भांडवलकर, प्रवीण पेठे, नितीन देशमुख, अमर देशमुख, आशिष लोखंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम आदमी पार्टी' नेही केले आंदोलन मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे कोसळणे ही महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप करीत आम आदमी पार्टीच्यावतीने वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड, प्रमोद भोमले, पंकज सत्यकार, असलम पठाण, प्रकाश डोडाणी, संजय आचार्य, सूर्या सोनोने, इसराइल शेख, कुणाल लोणारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजwardha-acवर्धा