प्रजासत्ताकदिनी आमसभा : १४ व्या वित्त आयोगातून होणाऱ्या कामांची निवडपवनार : प्रजासत्ताकदिनी पवनार येथे आमसभा घेण्यात आली. आमसभेत हावाच्या विकासासंबंधी अनेक मुद्यांवर चर्चा झाली. रस्ते, पिण्याचे पाणी, वराहांचा सुळसुळात आणि खाताची समस्या आदींवर ग्रामसभेत चर्चा झाली. १४ व्या वित्त आयोगातून होणाऱ्या कामाची आमसभेतून निवड करण्यात आली. यामध्ये वार्षिक विकास आराखडा, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामाची निवड जि. प., पं. स. सेसफंड योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड, वैयक्तिक शौचालय बांधकाम लाभार्थी निवड, भांडवली मुल्याप्रमाणे फेरफार आकारणी निर्धारण, नरेंगा अंतर्गत कामाची व वैयक्तिक लाभार्थी निवड, प्रलंबित लेखा आक्षेप निकाली काढणे, शासकीय परिपत्रकाचे वाचन, शेतकऱ्यांकरिता सौर पंपाची माहिती ई. लायब्ररी निर्माण करणे, खेळाचे मैदान तयार करणे, ठराव मंजूर करण्यात आले. वराहांचा मुक्त संचार थांबविण्यासाठी वराह धारकांवर कार्यवाही करण्याचा ठराव घेण्यात आला जलशुद्धीकरणाच्या लोकार्पणाची तारीखही १२ फेब्रुवारी निश्चित झाली. नंदीखेड्यावरील अस्वच्छता कमी करण्यासाठी येथील व्यावसायिकांवर कराची आकारणी करण्याचा ठरावही मंजूर झाला. आमसभेत सरपंच अजय गांडोळे, विस्तार अधिकारी विठ्ठल जोगे, ग्रा. प. सदस्य, कृषी सहायक भोयर, पं. स.च्या अंभोरे, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
आमसभेत गावाच्या विकासाचे अनेक प्रश्न लागले मार्गी
By admin | Updated: January 28, 2016 02:14 IST