शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

धर्माच्या नावावर आर्वी शहरात कधीही दंगे झाले नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:10 IST

धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देसुधीर दिवे : यंग मुस्लीम वेलफेअरचा सत्कार समारंभ

ऑनलाईन लोकमतआर्वी : धर्माच्या नावावर शहरात कधीच दंगे झाले नाही. देशातील आतंकवाद संपविण्याकरिता तेलंगराय देवस्थानापासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत सुधीर दिवे यांनी व्यक्त केले.यंग मुस्लीम वेलफेअर असो. च्या वतीने गांधी चौकात आतंकवाद विरोधी परिषदेद्वारे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते सत्काराला उत्तर देत होते. ते पूढे म्हणाले की, सर्व धर्म, पंथ व जातीचे लोक एकाच ठिकाणावर नतमस्तक होऊन एकतेचा संदेश देणाऱ्या तेलंगराय बाबांच्या कर्मभूमीत माझा जन्म झाला. याच ठिकाणी असलेल्या दर्ग्यालगत माझा सत्कार करण्यात आला, हे भाग्य समजतो. शासकीय सेवेत असताना १९९१ साली मी नागपूर तहसीलदार म्हणून कार्यरत असताना महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते देशातील उत्कृष्ट शासकीय अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. त्यापेक्षाही मोठा आनंद आज माझ्या कर्मभूमीत झालेल्या सत्कारामुळे झाल्याचेही दिवे यांनी सांगितले.आतंकवाद हा देश आणि मानव समाजाकरिता धोका आहे, या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलरत्न पुरस्कार प्राप्त रमेशचंद्र राठी तर अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे उपस्थित होते.जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध वक्ते डॉ. गारीब अहमद म्हणाले की, विविधतेने नटलेल्या भारत देशातील सर्व जाती, पंथात सकारात्मक भावना निर्माण झाली तर एकोपा वाढेल. मानव समाजाकरिता घातक असलेल्या आतंकवाद देशातूनच नव्हे तर जगातून समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आतंकवाद म्हटला की एका समाजाचे नाव पुढे येते; पण देशाची फाळणी झाल्यापासून त्या समाजाची नाळ भारत देशासोबत जुळली आहे, हे का विसरत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ही द्वेशभावना निर्माण करण्याकरिता प्रसार माध्यमातून प्रसारित होणारी नकारात्मक भूमिका कारणीभूत असून त्यावर प्रतिबंध घातला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी विशेष कार्य. अधिकारी केंद्रीय मंत्री जलसंपदा नदी विकास व गंगा पुनर्जीवन सुधीर दिवे, समाजसेवक श्रीधर ठाकरे, अभियंता निलेश गायकवाड, तहसीलदार विजय पवार, ठाणेदार अशोक चौधरी यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. संचालन वेलफेअरचे अध्यक्ष नजीर खान रिजवी यांनी केले. कार्यक्रमाला परवेज अहमद साबीर, मोहम्मद अगाजउद्दीन, मोहम्मद एजाज अंसारी, मोहम्मद सरफराज नागोरी, अब्दुल रफीक, सदस्य आरिफ नागोरी, ईस्माईल खान, शेख कलीम कुरेशी, शेख जब्बार, सैय्यद जुबरे, रिजवान अहमद, शेख समीर, मिर्झा अश्पाक बेग यांनी सहकार्य केले.