शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

खड्ड्यांतून शोधावा लागतो इतवारा मार्ग

By admin | Updated: April 17, 2016 02:00 IST

सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

सेवाग्राम रेल्वे स्थानकापासूनच खड्डे : बसस्थानकाकडे जाणारा जवळचा रस्ता असूनही उपेक्षितवर्धा : सेवाग्राम रेल्वे स्थानकाकडून इतवारा मार्केटमधून वर्धा शहराकडे येत असलेल्या मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली आहे. गिट्टी पूर्णपणे उखडून बाहेर आली आहे. परिणामी काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे सध्या इतवारा मार्ग हा अपघाताला स्वस्त झाल्याचे प्रवाश्यांमधून बोलल्या जात आहे. सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. नियमित अपडाऊन करीत असलेल्या प्रवाश्यांचे वेळापत्रक हे रेल्वेवर अवलंबून असते. यामध्ये अनेक प्रवासी हे वर्धा बसस्थानकावर उतरून तात्काळ सेवाग्राम रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी निघतात. यासाठी त्यांना आॅटोने इतवारा मार्ग सोयीचा पडतो. त्याचप्रकारे रेल्वेने सेवाग्राम स्थानकावर आलेल्या नागरिकांना तात्काळ वर्धा बसस्थानकावर जायचे असल्यासही हाच मार्ग जवळचा असतो. अशा प्रवाश्यांची संख्या ही जास्त असल्याने या मार्गावर आॅटो आणि दुचाकीचालकांची नेहमीच वर्दळ असते. पण या डांबरी रस्त्याची सध्यस्थितीत अत्यंत दैना झाली आहे. ठिकठिकाणी रस्ता उखडून मोठमोठे खड्डे पडले आहे. गिट्टी रस्त्याच्या बाहेर जमा होत चालली आहे. परिणामी अपघाताची शक्यता या मार्गावर वाढत आहे. किरकोळ अपघात तर नित्याचेच झाले आहे. त्यामुळे या महत्वाच्या रस्त्याची पक्की दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने रस्ता आणखी खराब होणार आहे. अश्यावेळी वाहनानेच काय तर पायी चालणेही कठीण होऊन बसणार आहे. वाहनामुळे गिट्टी उडून ती मागच्या वाहनचालकांना लागत असल्याचे प्रकारही येथे नेहमीच घडत असतात.(शहर प्रतिनिधी)रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने वाहने होतात अनियंत्रितरस्त्यावरील गिट्टी उघडी पडल्याने वाहने अनियंत्रित होऊन होणारे अपघात आता नित्याचेच झाले आहे. त्यातच समोरच्या वाहनाद्वारे गिट्टी उडून ती मागाहून येत असलेल्या वाहनावर उडून वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे खड्डे चुकवून वाट काढणे वाहनचालकांना जिकरीचे जाते. त्यातच आॅटोचालक भरधाव वाहने चालवित असतात. त्यामुळे आॅटोत बसलेल्या प्रवाश्यांनाही स्टेशन आणि बसस्थानकावर पोहोचेपर्यंत हादरे सहन करावे लागतात. त्यामुळे त्यांच्यासाठी हा प्रवास नकोसा होतो.