लाभार्थ्यांना प्रतीक्षा : ३०० अर्ज प्रलंबितकारंजा (घा.) : तालुक्यात गत सात महिन्यापासून संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची बैठक झालेली नाही. त्यामुळे गरीब, ज्येष्ठ निराधार नागरिक, बैठक केव्हा होणार आणि आपली निवड होवून आर्थिक लाभ केव्हा मिळणार याची प्रतीक्षा करीत आहे. विधानसभा निवडणूक होवून सात ते आठ महिन्यांचा कालावधी लोटला. अद्याप भाजपा सरकारद्वारे संजय गांधी निराधार समितीचे गठन करण्यात आले नाही. यावरून या सरकारला गरीब जनतेच्या हिताची काळजी किती याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकमंत्र्यांनी त्वरित, समिती गठन करून गोरगरिबांना आर्थिक लाभ द्यावा, अशी मागणी तालुक्यातील ज्येष्ठ व निराधार नागरिक करीत आहे.२० डिसेंबर २०१४ रोजी जुन्या समितीची शेवटची सभा झाली. त्यानंतर भाजपा सरकार सत्तेवर आले. जुनी समिती बरखास्त झाली. पण नवीन समिती गठन करण्यात आली नाही. संजय गांधी व श्रावण बाळ योजनेंतर्गत जवळपास ३०० लाभार्र्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहे. वास्तविक पाहता काही अपरिहार्य कारणास्तव समिती जर गठित झाली नाही, तर एसडीओच्या आदेशाने तहसीलदारांना विशेष बैठक घेवून लाभार्थ्यांची निवड करता येते, पण तहसील प्रशासनाने तशी तसदी घेतली नाही. एस.डी.ओ. आर्वी यांनी याकडे लक्ष घालून निराधाराची समस्या सोडवावी, अशी अपेक्षा आहे.(तालुका प्रतिनिधी)
सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेची बैठकच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 02:15 IST