शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपुरात पिण्याचे पाणी नाही

By admin | Updated: May 28, 2017 00:22 IST

नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे.

नागरिकांची भटकंती : टँकरणे पाणी पुरवठ्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क समुद्रपूर : नगर पंचायतच्या लहरी कारभाराने कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याने शहरातील तीन प्रभागातील नागरिकांची पाण्याकरिता भटकंती होत आहे. या प्रभागातील नागरिकांना मागील पाच दिवसांपासून पिण्याचेही पाणी मिळाले नाही. यामुळे नागरिकांची भटकंती होत असून पाण्याकरिता हाहाकार माजला आहे. चार दशकांपूर्वी बांधलेली येथील पाण्याची टाकी जीर्ण झाली आहे. तसेच शहराच्या लोकसंख्येत वाढ झाली आहे. यामुळे अस्तित्त्वात असलेली पाणी पुरविण्याची व्यवस्था तोकडी पडत आहे. यामुळे नागरिकांना पाण्याकरिता भटकावे लागत आहे. तत्कालीन सरपंच स्व. वसंतराव निखाडे यांनी तत्कालीन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे येथे शासन असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नळ योजना मंजूर करून घेतली; पण त्या योजनेचे पाणी टाकीत पोहोचले नाही. यामुळे येथील स्मशानभूमित एक बोर खोदले. त्याला पाणी लागले. ते पाणी विहिरीत घेत जनतेला पुरविण्यात आले. ग्रामपंचायतीचे रूपांतर आता नगरपंचायतीत झाले. यामुळे शहराचा विकास होईल, असे वाटत असताना नियोजनाअभावी नागरिकांची पाण्याकरिता होरपळ होत आहे. यावर्षी असलेल्या उष्णतेमुळे पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. नगर पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांत एकजुटता तसेच कर्मचाऱ्यांवर नसलेल्या वचकाचा परिपाक म्हणून येथील नारिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नळ योजनेची विहीर पूर्ण आटली असून नगर पंचायतने टँकरने पाणी पुरवावे, अशी मागणी या पाचही प्रभागात जोर धरत आहे. ९ मे रोजी झालेल्या मासिक सभेत टँकरने पाणी वाटप करण्याची विरोधी पक्षाची मागणी मान्य केली; पण अद्याप टँकरची व्यवस्था झालेली नाही. नगर पंचायतने त्वरित व्यवस्था करावी. - मधुकर कामडी, गटनेता. पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता टँकरकरिता वर्क आॅर्डर दिली आहे. टँकर लवकर येऊन सर्वांना पाणी मिळेल. - गजानन राऊत, पाणी पुरवठा सभापती, न.पं. समुद्रपूर.