शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कापूस वेचणीच्या संशोधन अहवालावर कार्यवाही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 13:43 IST

भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने सादर केलेल्या अहवालावर अद्याप कारवाई न झाल्याने कापूस वेचणी करणा:या महिला मजुरांचे हाल तसेच राहिले आहेत.

ठळक मुद्देवर्ध्यात महिला मजूरांना त्रास  यांत्रिकीकरणाकडे सरकारची पाठमणक्याचे आजार, कंबरेचे आजार होतात

सुधीर खडसे वर्धा- भारतात अनेक भागात कापूस वेचणीचे काम महिला मजूरांकडून करून घेतले जाते. मात्र महिला मजूरांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन भारतीय कृषी कापूस अनुसंधान संस्थेने आॅक्टोबर २००४ मध्ये या संदर्भात अभ्यास करून शासनाकडे निष्कर्ष अहवाल सादर केला होता. यावर कार्यवाही करून कापूस वेचणीच्या कामात यांत्रिकीकरण, महिलांचा त्रास कमी होणाऱ्या बाबी अमलात आणाव्या अशा सूचना केल्या होत्या. मात्र या अहवालावर कोणतीही कार्यवाही अद्याप झालेली नाही. त्यामुळे कापूस मजूरांच्या व्यथा कायमच आहे. जगात भारत, पाकिस्तान, आॅस्ट्रेलिया, इस्राईल, अमेरिका या देशामध्ये ९० टक्के कापसाचे उत्पादन होते. येथे कापूस वेचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. भारतात मात्र महिला मजूरांकडून कापूस वेचून घेतला जातो. पाच बोटांमध्ये कापूस पकडून तो बोंडाबाहेर काढण्याचे काम करण्यात येते. कापूस वेचणीची ही पद्धती अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामध्ये मणक्याचे आजार, कंबरेचे आजार आदीही होतात असा निष्कर्ष अभ्यासकांनी काढला आहे.आॅक्टोबर २०१४ मध्ये भारतीय कृषी अनुसंधारण परिषदेने कापूस पिकावर जागतिक संशोधन केले. या संशोधनात कापूस वेचणीबाबत काही निष्कर्ष मांडले. त्यात भारत आणि पाकिस्तान आणि चीन या देशात कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर करण्याची टक्केवारी शून्य असल्याचे नमूद केले आहे. कापूस वेचणीसाठी मराठवाड्यातील परभणी येथील कृषी विद्यापीठाने कापडाचा खिसा असलेला कोट वापरण्याची सूचना केला होती. समोरच्या भागात साडेपाच किलो कापूस मावेल असा पद्धतीचा कोट तयार करण्यात आला होता. मात्र कापूस वेचणाºया महिला स्वखर्चाने हा कोट खरेदी करीत नाही. असे आढळून आले. नॅशनल हार्टिकल्चर मिशनचे संचालक चंद्रशेखर पडगिलवार यांनी म्हटले आहे की, भारतात कापूस वेचणीचे यंत्र तयार करण्यात आले आहे. हे यंत्र बोंडाजवळ नेल्यावर ५० ते ६० किलो कापूस एका तासात वेचते. एका तासात १०० किलो कापूस वेचणे शक्य आहे परंतु आपल्याकडे राज्य सरकारचा कृषी विभाग कापूस वेचणीच्या कामात यांंत्रिकीकरणाचा वापर करून घेण्याबाबत प्रचंड उदासीन आहे. त्यामुळे आजही महिलांना कापूस वेचणीचे काम करावे लागत आहे. यंदा कापूस वेचणी महागलीपूर्वी विदर्भाच्या विविध भागात एक महिला दिवसभर जितका कापूस वेचत होती. त्यानुसार किलोच्या आधारे रोजी दिली जात होती. यंदा मात्र २०० रुपये रोजीच्या महिला कापूस वेचणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना ठेवाव्या लागत आहे. एक महिला साधारणत: २० ते २५ किलो कापूस दिवसभरात वेचते. पूर्वी १३० रूपयात हे काम व्हायचे आता २०० रुपये द्यावे लागत आहे. म्हणजे ७० रुपए अधिकचे शेतकऱ्याला मोजावे लागत आहे. त्यामुळे आता कापूस वेचणीसाठी यांत्रिकीकरणावर भर देणे गरजेचे झाले आहे. विदर्भात कापूस हे सर्वात महत्वाचे पीक आहे. व ते नगदी असल्याने शेतकरी यावरच उभा आहे. 

टॅग्स :agricultureशेती