शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीपेक्षा कडब्याचा भाव अधिक

By admin | Updated: November 27, 2015 02:19 IST

पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे.

पेरा घसरणीवरच : जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातून ज्वारी हद्दपारवर्धा : पाऊस कमी आला किंवा जास्त आला तरी हमखास होणारे उत्पन्न म्हणून ज्वारीची ओळख आहे. मात्र जंगली श्वापदांच्या हैदोसामुळे ही ज्वारी जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. वैरणाकरिता उपयोगी येत असलेली ज्वारी बाजारात चढ्या दरात विकत घ्यावी लागत आहे. आजघडीला बाजार समितीचा फेरफटका माारला तरी ती येथे ज्वारी विक्रीला आली नसल्याचे दिसून आले आहे. एक क्विंटल ज्वारीला बाजारात १६०० ते २००० रुपये भाव मिळतो आहे. पण ज्वारीच्या धांड्यांची एक पेंडी ७ रुपयांच्या भावात विकली जाते. त्यामुळे हजार पेंड्यांकरिता ७ हजार रुपये मोजावे लागतात. हा भाव पाहिल्यावर ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव अधिक असल्याचे दिसून आहे. कृ षी विभागाच्या खरीप हंगाम नियोजनात ज्वारीच्या पिकाचे लागवड क्षेत्र पाच हजार हेक्टरच्या आसपास अपेक्षित धरले जायचे. दिवसागणिक या क्षेत्रामध्ये घट होत गेली. आजच्या स्थितीला जास्तीत केवळ एक हजार हेक्टर क्षेत्रातही ज्वारीची लागवड होत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी होत होती. आता तिची जागा हायब्रिडने घेतन्ली आहे. ज्वारीचा पेरा जिल्ह्यात वाढला. तेव्हा बाजारात ११०० रुपये क्विंटलचा भाव मिळायचा व उत्पन्नाचे प्रमाण एकरी १० क्विंटलच्या आसपास होते. १९९० नंतर जिल्ह्यात श्वापदांच्या हैदोसाला सुरुवात झाली. हळूहळू ज्वारीच्या पेऱ्याचे प्रमाण कमी होत गेले. परिणामी ज्वारीच्याा धांड्यांना वैरण म्हणून असलेली मागणी वाढली. ज्वारीपेक्षा वैरणाची किंमत अधिक झाली. १९९५ च्या दरम्यान २२०० रुपयात १ हजार पेंडी कडबा विकला जात होता. गुरांच्या पंसतीचे खाद्य म्हणून ज्वारीच्या कडब्याची ओळख असताना दुहेरी उत्पन्न ज्वारीतून पिकांतून मिळत होते. ज्वारी भाकरीकरिता तर कडबा गुरांकरिता असे समीकरण राहायचे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बैलजोडीसह दुधाळू जनावरे होती. श्वापदांनी ज्वारीचा फडशा पाडायला प्रारंभ केल्याने ज्वारीच्या उत्पन्नात घट झाली.जिल्ह्यात रोह्यांसह रानडुकरांची संख्या वाढली. ही दोन्ही श्वापद पिकांची सर्वाधिक नासाडी करणारे आहेत. जवारीचा धांडा गोड लागत असल्याने तो खाण्याकरिता रोही व डुक्कर याच शेतांमध्ये ठाण मांडायचे. तर पक्षी ज्वारीच्या कणसातील दाणे टिपून नुकसान करीत होते. सर्वांधिक नुकसान श्वापदांनी केल्यामुळे उत्पादन सतत घटत राहिले. रोही व डुक्कर पीक खाण्याऐवजी ते खाली पाडत असल्याने त्याचे नुकसान अधिक व्हायचे. यात नुसता वेळ जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. परिणामी असा झाला की बाजारपेठेत हायब्रिड ज्वारीचा भाव आज २ हजार रुपये क्विंटलच्या घरात पोहोचला तर भारी ज्वारीला ३ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. शहरातील गोपालकांना हिरव्या वैरणाची एक पेंडी १५ रुपयांची झाली आहे. म्हणजेच १५ हजार रुपयात १ हजार पेंड्या कडबा विकला जातो. ज्वारीपेक्षा वैरणाचा भाव आज अधिक झाला. जंगली श्वापदांमुळे जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड बंद केली. म्हणूनच बाजार समित्यांमध्ये ज्वारीचे पांढरे शुभ्र बारिक दाणे विक्रीकरिता येत नसल्याचे वास्तव आहे. बाजार समित्यांमध्ये धान्य खरेदीचा शुभारंभ होऊन दोन महिन्यांचा कालखंड लोटला, पण एकाही ठिकाणी ५ क्विंटलपेक्षा जास्त ज्वारी विक्रीकरिता आली नाही. हे विदारक सत्य लक्षात घेऊन तरी कृती होणार काय, असा प्रश्न आहे.(प्रतिनिधी)