शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

उर्ध्व वर्धातून विसर्ग सुरूच

By admin | Updated: August 7, 2015 01:54 IST

जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पावसाचा फटका : १९६ गावातील १,१३९ कुटुंबे बाधित झाल्याचा अंदाजवर्धा: जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून आलेल्या पावसाचा चांगलाच फटका बसला. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे धाम, मदन उन्नई, वर्धा कार नदी आणि सुकळी लघु प्रकल्पात गत दोन दिवसांच्या पावसाने १०० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे. धाम प्रकल्पावरून १११.१०, मदन उन्नई धरणावरून ०.७८, उर्ध्व धरण १०३, वर्धा कार नदी ३५.९१, निम्न वर्धा ५५७ आणि सुकळी लघु प्रकल्प १.०९, क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. तर निम्न वर्धाचे ३१ दरवाजे, उर्ध्व वर्धाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपूर्वी दमदार पाऊस आला. तर बुधवारी समुद्रपूर वगळता सातही तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. काही भागात या पुराचे पाणी गावात शिरल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला. तर काही भागात पावसाच्या संततधारीमुळे घरांची पडझड झाली. पडझड झालेल्या घरांचा सर्व्हे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला असला तरी शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करणे बाकी असून शेतकऱ्यांना मदतीची मागणी होत आहे. गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका जिल्ह्यातील १९६ गावांना बसला. तर सततच्या पावसामुळे १ हजार १३९ घरांची पडझड झाली. यात ८८६ घरे अंशत: तर २५३ घरे पुर्णत: बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात गत २४ तासात ७०.७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस आष्टी तालुक्यात २३.८० मि.मी एवढा नोंदविण्यात आला. आतापर्यंत सर्वाधिक पाऊसही आष्टी तालुक्यातच ६६८. मि.मी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. इतर तालुक्याची पावसाची आकडेवारी कंसात आतापर्यंतच पाऊस वर्धा ३.७० (६६६), सेलू १ (४५१), देवळी ३.२० (५३७.९०), हिंगणघाट ६५२.३२, समुद्रपूर २ (५०५.५१), आर्वी ११ (६३५.३२) आणि कारंजा २२ (६४१.७०) एकूण पाऊस ७०.७० (४७५७.७५), सरासरी ८.८४ (५९४.७२) पावसाची नोंद आहे.शेताच्या नुकसानीचा सर्वेक्षण करण्यात दिरंगाई बुधवारी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतात पाणी साचले तर बऱ्याच भागात नदी नाल्याच्या पुराखाली शेती आली. त्यातील पाणी अद्यापही बाकीच आहे. यामुळे शेतात असलेले उभे पीक खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बऱ्याच शेतातील जमीन खरडून गेली आहे. पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचा सर्व्हे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.