शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, रस्ता खोदलाय; बांधकाम कधी? रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 16:29 IST

कंत्राटदाराचे काम आस्तेकदम: सिंदी (मेघे) ते शांतीनगर रस्त्याची झाली दैनावस्था

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या सिमेंटीकणाचे काम गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सुरू आहे. कंत्राटदाराने एका बाजूने रस्ता खोदून ठेवला असून कामाला गती नसल्याने या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीचा चांगलाच मनस्ताप होत असून 'साहेब, रस्ता खोदलायः बांधकाम होणार कधी? असा प्रश्न विचारला जात आहे.

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसरातील रस्त्यांचीही कामे हाती घेण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ही सिमेंटीकरणाची कामे होत असून या रस्त्याचा मुख्य कंत्राटदार वेगळा आणि काम करणारा कंत्राटदार वेगळा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे पेटी कंत्राटदारही मनमर्जीने काम करीत असून अधिकाऱ्यांचीही हातचेपी भूमिका राहत असल्याचे दिसून येत आहे. सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौकापर्यंतच्या १.०१ किलोमीटर रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबई येथील एसआरके कंपनीला १३ कोटी रुपयांत दिले आहे. परंतु या रस्त्याचे काम माया तिवारी नामक कंत्राटदार करीत आहे. साधारणतः दोन ते अडीच महिन्यांपासून हा रस्ता एका बाजूने खोदून ठेवला असून कामाची गती फारच मंद असल्याने एका बाजूने वाहतूक करताना नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका बाजुने रस्त्याचे खोदकाम केले तर दुसऱ्या बाजुने वाहतूक सुरु असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्या खड्यात पाणी साचले असून त्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे. या मार्गावर चांगलीच वर्दळ राहत असून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे

सुरक्षा कठडे नसल्याने अपघाताचा धोका सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक हा रस्ता पुढे बायपास, नागठाणा व उमरीकडे जात असल्याने या रस्त्यावर सतत वर्दळ असते. कंत्राटदाराने हा रस्ता एका बाजूने चांगलाच खोदून ठेवला असून कामही धिम्यागतीने सुरू आहे. खोदकाम केलेल्या रस्त्याच्या बाजूला सुरक्षा कठडे नसल्याने रात्रीच्या सुमारास नवख्या वाहनचालकांना हे खोदकाम लक्षात येत नाही. त्यामुळे वाहने सरळ खोदलेल्या भागात शिरत असल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असून सुरक्षा व्यवस्था करण्याचीही गरज व्यक्त होत आहे.

वेळेत काम पूर्ण करणार का? सार्वजनिक बांधकाम विभागा- कडून ज्या कंत्राटदार कंपनीला काम दिले त्या कंपनीने वर्ध्यातील माया तिवारी नामक कंत्राटदाराला हे काम दिले आहे. दिलेल्या मुदतीत काम करण्याचा करारनामा झाला असला तरी तिवारी नामक कंत्राटदाराने काम कालावधीत पूर्ण केल्याचे ऐकिवात नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जुनापाणी चौक या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आरती चौकाचे कामही कालावधीत पूर्ण केले नाही. त्यामुळे सिंदी (मेघे) ते शांतीनगर चौक या रस्त्याचे काम तरी कालावधीत पूर्ण करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

"सिदी (मेघे) ते शांतीनगर चौक या मार्गाच्या सिमेंटीकरणाचे कंत्राट मुंबईच्या कंपनीला दिले असून वर्ध्यातील माया तिवारी हे काम करीत आहेत. दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली असून पावसाळ्यामुळे सुरुवातीला मुरुमाची अडचण होती. आता मुरुम टाकण्यात आला असून जीएसीबीचे कामही झाले आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण केली जातील. पावसामुळे या रस्त्याच्या कामाची गती कमी झाली."- स्वप्नील खंडार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :wardha-acवर्धाroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा