शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सेवाग्रामात साकारणार देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रात दीड वर्षाचे प्रशिक्षण अवघ्या सहा महिन्यांत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी खुद्द वर्धा गाठून सेवाग्राम येथे सोमवारी आढावा बैठक घेतली.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी तसेच अमेरिका येथील नोंदणीकृत ‘जपायगो’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या सेवाग्राम येथे देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांशी प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प असून या प्रशिक्षण केंद्रात दीड वर्षाचे प्रशिक्षण अवघ्या सहा महिन्यांत दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. राज्य शासनाचा हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी खुद्द वर्धा गाठून सेवाग्राम येथे सोमवारी आढावा बैठक घेतली. तब्बल तासभर चाललेल्या या बैठकीदरम्यान डॉ. अर्चना पाटील यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्यात.

एमएलसीयू स्थापनेनंतर सुरू होणार प्रत्यक्ष प्रशिक्षण-   एमएलसीयू (मीडवायफरी लेड केअर युनिट) स्थापन झाल्यावर सेवाग्राम येथील कस्तुरबा नर्सिंग स्कूलच्या आवारात उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. एका बॅचच्या माध्यमातून जास्तीत जास्त ३० प्रशिक्षणार्थ्यांना एएनएमचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत दिला २५ लाखांचा निधी-    देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत २५ लाखांचा निधी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. तो निधी नुकताच सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटीला वळता करण्यात आला आहे. -    हाच निधी राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्रासाठी खर्च होणार आहे.

विदेशी तज्ज्ञांनी केली जिल्ह्यातील प्रसूतीच्या सेवा-सुविधांची पाहणी-    इंटरनॅशनल ट्रेनर फॉर नर्स प्रॅक्टिशनर मीडवाईफ युकेच्या मिस पोला तसेच इंटरनॅशनल ट्रेनर फॉर नर्स प्रॅक्टिशनर मीडवाईफ युएसएच्या मिस केथ यांनी मंगळवारी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांना भेटी देत तेथील प्रसूतीच्या सेवा व सुविधांची माहिती जाणून घेतली. या विदेशी तज्ज्ञांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय, वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय, आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा तसेच खरांगणा (मो.) येथील आरोग्य उपकेंद्राला भेटी दिल्यात. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. नितीन निमोदिया तसेच डॉ. प्रभाकर नाईक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सिव्हिल काम होणार ९० दिवसांत पूर्ण-    सेवाग्राम येथे साकारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्राचे सिव्हिल काम येत्या ९० दिवसांत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले. लवकर प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.

देशातील पहिले राष्ट्रीय स्तरीय प्रसविका प्रशिक्षण केंद्र सेवाग्राम येथे साकारण्यात येणार आहे. त्यासाठी २५ लाखांचा निधी कस्तुरबा रुग्णालयाला वळता करण्यात आला आहे. मंगळवारी विदेशी तज्ज्ञांनी जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील प्रसूतीच्या सेवा-सुविधांची शासकीय रुग्णालय गाठून पाहणी केली.- डॉ. रा. ज. पारडकर,  जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम