शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विविध समस्यांसंदर्भात आंदोलने करणाऱ्यांची वाढली गर्दी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 16:22 IST

Wardha : समस्यांविरुद्ध आवाज वाढलेत; निवडणूक जवळ आली वाटतं!

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यात विविध समस्या कायम असून, त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते; परंतु गत दोन महिन्यांत विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालये, तर तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर उपोषणे, आंदोलने करणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निवडणूक जवळ आल्याचे जाणवत असल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

आगामी काही दिवसांत विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेणे सुरू केले आहे, तसेच इच्छुक उमेदवार मतदारांची समस्या मार्गी लागण्यासाठी तत्पर असल्याचे दिसून येत आहे. एरवी दुर्लक्षित असलेल्या विविध समस्यांसंदर्भात आंदोलनांतची संख्या अचानक वाढल्याने निवडणूक जवळ आली असल्याची चर्चा आहे. 

शहरातील समस्यांबाबत इच्छुकांचा आवाज! आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांकडून शहरातील समस्यांबाबत आवाज उठविला जात आहे. याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयात धडक देऊन आंदोलने करणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे.

स्थानिक समस्यांवर कुठे आंदोलने होतात? "शहरातील रस्ते दुरुस्तीशिवाय इतर स्थानिक समस्यांवर कुठेही आवाज उठविला जात नाही. शहर स्वच्छतेसह शहरात पार्किंगची समस्या, वाढते अतिक्रमण आदींवर कोणीही बोलायला तयार नाही." - सीताराम सातपुते, वर्धा

शहरातील या समस्यांवर प्रकाश कधी पडणार?मलनिस्सारण योजना : शहरात कोट्यवधी रुपये खर्ची घालून मलनिस्सारण योजना अमलात आणली. मात्र, अद्यापही या योजनेचे काम पूर्णत्वास गेलेले नाही. शिवाय फोडलेल्या रस्त्याचा प्रश्न अजूनही शहरातील काही भागांत कायम आहे. हा महत्त्वाचा प्रश्न असताना मात्र याकडे कुणीही लक्ष देताना दिसून येत नाही. 

शहराची स्वच्छता नाही : शहरातील नियमित स्वच्छता केली जाते. मात्र, असे असताना ठिकठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कायम आहेत. यामुळे परिसरात अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरलेली आहे. याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर : शहरातील प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. मात्र, पालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या व्यावसायिकांना अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे. तर लहान व्यावसायीकांवर कारवाई होत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धा