शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतील घोळ तातडीने दुरुस्त करावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 17:39 IST

आमदारांचे निर्देश: नागरिकांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याने येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागेल. मतदार यादीमधील हा घोळ दुरूस्त करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्यात यावीत, असे निर्देश आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तहसीलदार संदीप पुंडेकर यांना दिले.

वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी, नालवाडी, साटोडा - आलोडी, म्हसाळा, सिंदी, सावंगी, बोरगाव, उमरी व अन्य मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे. यासाठी धावाधाव करावी लागली होती. अनेकांचे नाव मतदार यादीतून गहाळ झाल्याचे निर्दशनास आले होते. तथापि, अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. एकीकडे निवडणूक विभाग व प्रशासन मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रयत्न करतात तर दुसरीकडे मतदार यादीतील घोळामुळे अनेकांना आपल्या हक्कापासून वंचित राहावे लागल्याची परिस्थिती लोकसभा निवडणुकीदरम्यान समोर आली होती. हे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी तहसीलदारांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पिपरीच्या सरपंच वैशाली अजय गौळकर, आलोडी साटोडाचे सरपंच बादल विरुटकर, पिपरीचे उपसरपंच गजानन वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य फारूख शेख, नालवाडीचे अजय वरटकर, पिपरी ग्रामपंचायतचे सदस्य वैभव चाफले, प्रशांत खंडारे, म्हसाळाचे संदीप पाटील, संदीप इंगळे, संदीप मारवाडी, अनंता राऊत, भाजपाचे उपाध्यक्ष जयंत कावळे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, नेरी पुनर्वसनचे प्रवीण चोरे, गिरीश कांबळे, भाजपचे सेलू तालुका अध्यक्ष अशोक कलोडे व नागरिक उपस्थित होते. 

अंतर वाढल्याने मतदार केंद्रावर गेलेच नाहीतयावेळी पिपरीच्या सरपंच वैशाली गोळकार यांनी त्यांचे नाव एका मतदान केंद्रावर तर पती व सासरे यांचे नाव दुसऱ्या मतदान केंद्रावर असल्याची माहिती दिली. अनेक मतदारांची नावे ते रहिवासी असलेल्या ठिकाणापासून दोन ते तीन किमी अंतरावर असल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत जाताना अडचण झाली. तसेच अनेक नागरिक दूर केंद्र असल्याने मतदानाला देखील गेले नाहीत. हा गोंधळ संपूर्ण क्षेत्रात झाला होता, असेही आमदार भोयर म्हणाले. लगतच्या सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील याद्यांचे पुनर्गठन करण्यात यावे. ज्यांची नावे यादीतून सुटली, त्यांची नावे जोडण्यात यावीत तसेच रहिवासी ठिकाणापासून जवळचे मतदान केंद्र देण्यात यावे, अशी सूचना आमदारांनी केली. 

टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2024Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगwardha-acवर्धा