शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर मार्गावर कार धू-धू जळाली; अन् यवतमाळचे दुधे कुटुंबीय बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्याचे सांगितले. वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. भर रस्त्यात कार जळत असल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : नागपूर-तुळजापूर मार्गावर सेलसूरा शिवारात भरधाव असलेल्या कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अवघ्या २० मिनिटांत ही कार धू-धू जळून कोळसा झाली.गुरुवारी दुपारी हा अपघात  झाला असून, चालकाने वाहन थांबविताच वाहनातील सर्वांनी वाहनाबाहेर पळ काढल्याने यवतमाळ येथील दुधे कुटुंबीय थोडक्यात बचावले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठून पूर्णपणे आगीच्या कवेत असलेल्या कारवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.होळीचे औचित्य साधून मुलीला गाठी-चोळी देण्याची प्रथा आहे. हीच प्रथा पूर्ण करण्यासाठी यवतमाळ येथील दुधे कुटुंबीय कारने (एम.एच.२९ बी.सी.४२५६) यवतमाळकडून वर्धेच्या दिशेने जात होते. कारमधील चालक सुनील भगत, प्रणय दुधे, जयंत दुधे, विक्की गायकवाड, संजुमाला दुधे, सतिका दुधे (सर्व रा. यवतमाळ) हे गप्पा गोष्टी करीत प्रवास करीत असतानाच कार सेलसुरा शिवारातील पुलाजवळ आली असता कारच्या पुढील भागातून आगीचे लोळ उठत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने तातडीने वाहन थांबवून सर्वांना वाहनाबाहेर निघण्याचे सांगितले.वाहनातील सर्वच व्यक्ती बाहेर येताच आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण कारला आपल्या कवेत घेतले. भर रस्त्यात कार जळत असल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. दरम्यान, देवळीच्या अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच देवळीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. सुमारे पाऊण तासांच्या प्रयत्नाअंती आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या घटनेची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :carकारfireआग