शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

व्याघ्र दर्शनामुळे दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:57 IST

तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.

ठळक मुद्देलाडकी, सावंगी शिवारातील घटना : नागरिकांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात वाघाने दर्शन होत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीमुळे शेतकरी व शेतमजुर शेतात जाण्यास टाळत असून वन्यप्राण्यांकडून उभ्या शेतपिकांची नासडी केली जात आहे. त्यामुळे या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुका आतापर्यंत वाघाच्या प्रकोपापासून दूरच होता. मात्र, आता या भागातही पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने त्याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. या वाघाचा सध्या लाडकी व सावंगी (हेटी) परिसरात मुक्तसंचार होत असल्याने शेतीची विविध कामे सध्या ठप्प पडली आहेत. आज सकाळी वाघाने बैलाला गतप्राण केल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लाडकी व सावंगी (हेटी) शिवार चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्याला लागून आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी येथील रेल्वे पुलाजवळ पहाटे ६.३० वाजताच्या सुमारास व्याघ्र दर्शन झाले. तेव्हापासून वाघाचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी आहे.दहा गावांना सतर्कतेचा इशाराहिंगणघाट तालुक्यातील लाडकी व सावंगी (हेटी) शिवारात पट्टेदार वाघ दिसून येत असल्याने अनुचित घटना टाळण्यासाठी वन विभागाच्यावतीने परिसरातील दहा गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या गावातील नागरिकांना दिवसाला एकटे फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. शिवाय लहान मुलांसह महिलांना रात्रीला घराबाहेर निघण्याचे टाळण्यास सांगण्यात आले आहे. या भागात मुक्तसंचार होणार वाघ सुमारे ३ वर्षांचा असल्याचे सांगण्यात येते. तर वन विभागाची सात अधिकाºयांसह कर्मचाºयांची चमु सध्या परिसरात गस्त घालत आहेत.बैलाचा पाडला फडशावडनेर/ हिंगणघाट : नजीकच्या सारंगी (हेटी) शिवारात व्याघ्र दर्शन होत असल्याने या भागातील नागरिकांसह शेतकºयांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर वाघाच्या भीतीमुळे या भागातील शेतीची कामे पुर्णपणे ठप्प झाली आहेत. अनिल किसना साबळे यांच्या मालकीचा बैलाचा वाघाने फडशा पाडला. यामुळे त्यांचे बºयापैकी नुकसान झाले आहे. तर दिलीप राऊत, गोपीनाथ दाते, हर्षल सावंकार यांना नदीच्या काठच्या परिसरात वाघाचे दर्शन झाले. घटनेची माहिती मिळताच वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड, क्षेत्र सहायक एस. ए.काटकर, अमोल पिसे, प्रदीप थुल व प्रदीप दळवेयांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.