शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे लैगिक शोषण करणाऱ्यास दहा वर्षांचा सश्रम कारावास

By महेश सायखेडे | Updated: July 12, 2023 19:43 IST

दंडही ठोठावला : वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

महेश सायखेडे, वर्धा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करीत तिच्यासोबत वारंवार अतिप्रसंग करण्याऱ्या नराधमास दहा वर्षांच्या सश्रम कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. संबंधित निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी बुधवारी दिला असून मिलिंद ज्ञानेश्वर गिरीसपुंजे रा. देवळी असे शिक्षेस पात्र ठरलेल्याचे नाव आहे.

आरोपी मिलिंद गिरीसपुंजे यास भादंविच्या कलम ३७६ (२) (आय) (एन) अन्वये दहा वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर फौ.प्र.स.च्या कलम ३५७ अन्वये पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून दोन हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहे. संबंधित प्रकरणी तक्रारीवरून देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर देवळीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गजानन दराडे यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. ॲड. प्रसाद प. सोईतकर यांनी न्यायालयात शासकीय बाजू मांडली. तर पैरवी अधिकारी म्हणून ना.पो.शि. समीर कडवे यांनी काम पाहिले. शासनातर्फे एकूण बारा साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली.'पहिले हम साथ साथ है' नंतर 'हम आपके है कोण'

पीडिता ही वसतीगृहात राहून नवव्या वर्गाचे धडे घेत होती. पीडितेच्या शाळेसमोरील फोटो स्टुडिओत मिलिंद हा नेहमी बसायचा. त्याने पीडिते सोबत ओळख करून घेत तिच्याशी जवळीक निर्माण केली. जानेवारी २०१५ मध्ये आरोपीने पीडितेला मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्या सोबत लग्न करावयाचे आहे असे सांगत तिला मोबाईल घेऊन दिला. त्यानंतर आरोपीने पीडितेला देवळी येथे किरायाने रुम करून दिली. तेथे आरोपीने येत पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. आरोपीला पीडितेच्या रूमवर येताना घरमालकाने बघितल्यामुळे तिला सदर रूम सोडण्यास सांगण्यात आले.

त्यानंतर आरोपी हा पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. शिवाय तिला एक रुम दिली. दरम्यान पीडिता ही मध्यप्रदेशातील भोपाळ येथे गेली असता आरोपीने भोपाळ गाठले. मी तुझ्या सोबत लग्न करतो, शिक्षणाचा पूर्ण खर्च करतो असे सांगून आरोपीने पीडितेला सोबत आणले. वर्धा येथे किरायाने रूम करून दिली. त्यानंतर आरोपीने पीडिते सोबत अनेक वेळा शारीरिक संबंध केले. नंतर आरोपी पीडितेला काहीच न सांगता तेथून निघून गेला. पीडितेने आरोपी सोबत त्याचे मोबाईलवर वारंवार संपर्क केला असता आरोपीने माझा तुझ्या सोबत काहीही संबंध नाही, मी तुझ्या सोबत लग्न करणार नाही, मला भेटु नको असे सांगितले. त्यानंतर पीडितेने शेजारील महिला सोबत घेत देवळी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नाेंदविली.

टॅग्स :wardha-acवर्धाCourtन्यायालय