शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेल्या दहा बोटी अजूनही नदीपात्रातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 23:36 IST

वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या.

ठळक मुद्देयवतमाळ एसडीओ आणि देवळी तहसील कार्यालयाची संयुक्त कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा नदीच्या पात्रात बोटींच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकारी व देवळी तहसील कार्यालयाने संयुक्तरित्या कारवाई करीत दहा बोटी जप्त केल्या. परंतु, जप्त करण्यात आलेल्या बोटी नदीपात्रातच ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.वर्धा नदीपात्रात यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीतील रेतीघाटामध्ये बोटींच्या सहाय्याने रेतीचा उपसा सुरु होता. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्या बोटी वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्याच्या हद्दीत हलविल्या. त्यामुळे यवतमाळच्या उपविभागीय अधिकाºयांनी देवळी तहसील कार्यालयाला सूचना केली. लागलीच मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी वर्धा नदीपात्रातील वाघोली आणि आपटी घाटावर जाऊन दहा बोटी जप्त केल्या. यात वाघोली घाटात सात तर आपटी घाटात तीन बोटी आढळून आल्या. याप्रकरणी यवतमाळच्या उपविभागीय अधिकाºयांनी त्याच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, जप्तीतील दहाही बोटी अजुनही आपटी आणि वाघोली घाटात कायम असून त्या बोटी घाटधारकांसाठी तर ठेवल्या नाही ना, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.बोटी पळवून नेण्याची शक्यतादेवळी तालुक्याच्या हद्दीतील आपटी आणि वाघोली घाटात तहसीलदार भागवत यांनी कारवाई केली होती. त्यावेळी एक बोट हातात लागली तर डोळ्यादेखात नऊ बोटी रेती माफियांनी पळून नेल्या होत्या. जप्त केलेली ती बोट नष्ट करण्यात आली होती. त्या बोटीही यवतमाळ जिल्ह्यातील घाटधारकांच्या असून वर्धा जिल्ह्यात धुडगूस घालत होत्या. आताही यवतमाळ जिल्ह्यातील दहा बोटी वर्धा जिल्ह्यातच जप्त करण्यात आल्या आहे; पण त्या ताब्यात घेतल्या नसल्याने रेती माफिया त्या पळवून नेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या कारवाई आपटी घाटात तीन आणि वाघोली घाटात सात बोटी जप्त केल्या आहे. त्या बोटी जवळपास दीडशे ते दोनशे फुट खोलात असल्याने आपल्या हद्दीतून त्यांना ताब्यात घेण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत आज जिल्हाधिकाºयांना अहवाल पाठविण्यात आला. त्यावर मिळालेल्या मार्गदर्शनानंतर पुढील कारवाई केली जाईल.- प्रदीप वर्पे, प्रभारी तहसीलदार, देवळी.

टॅग्स :Wardha Riverवर्धा नदी