शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगण, आंध्रातील दीडशे कामगार अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही.

ठळक मुद्देचार धर्मशाळांमध्ये व्यवस्था : विविध सामाजिक सघटनांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाउन करण्याचे आदेश दिले असताना वर्ध्यातील एका कॉस्मॅटीक कंपनीत प्रशिक्षणाकरीता आलेले तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील सुमारे दीडशेच्यावर कामगार वर्ध्यातच अडकले आहे. त्यासर्वांच्या निवासाची व्यवस्था बच्छराज धर्मशाळेत करण्यात आली असून विविध सामाजिक संघटनांच्यावतीने पुढाकार घेत त्यांना दोन वेळचे जेवण, नाश्ता, चहा देण्यात येत आहे.वर्ध्यातील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका कॉस्मॅटिक बनविणाऱ्या कंपनीसह विविध कंपन्या संचारबंदी लागल्याने तसेच लॉकडाउन झाल्याने बंद करण्यात आल्या आहे. कंपनीमालकांनी कंपनीला टाळे ठोकून पळ काढला. तर कामावर असलेल्या कामगारांना मात्र, वाºयावर सोडले आहे. जिल्ह्यासह राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने कामगारांना आपल्या गावी जाता येत नाही. त्यांच्याजवळ दोन वेळचे जेवण मिळेल ऐवढे पैसेही नाही. त्यामुळे मिळेल त्याठीकाणी रात्री काढण्याची वेळ त्यांच्यावर आली असताना शहरातील विविध सामाजिक संघटना, एंजीओ यांनी त्यासर्वांना बच्छराज धर्मशाळेत एकत्र आणून त्यांच्या निवासाची आणि दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटना, सपर्मण संस्था, बचतगट, अंधश्रद्धा निर्मुलन समिती, निवसीड चाईल्डलाईन, ऑल इंडिया एक्स बिएसएफ वेल्फेअर संघ, प्रहार वाहन चालक संघटना, युथ फॉर चेंज, जिल्हा अन्नदान समिती आदी विविध सामाजिक स्वयंसेवी संघटनांच्यावतीने त्यांना मदत पुरविण्यात येत आहे.चारही धर्मशाळेत वैद्यकीय पथकाची नियुक्तीसंचारबंदी लागू झाल्याने जिल्ह्याबाहेरील लोकांचे स्थलांतर होऊ नये, म्हणून अशांची व्यवस्था शहरातील चार धर्मशाळेत करण्यात आली आहे. त्यानुसार बच्छराज धर्मशाळेत राजेश खामनकर, आशिष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदन मोहन धर्मशाळेत मंडळअधिकारी आर.बी. झामरे, प्रदीप मुंघाटे, संत कवरराम धर्मशाळेत तलाठी राजू देशमुख, अविनाश मरघडे तर न्यू इंग्लिश हायस्कूल येथे तलाठी प्रदीप लोन, आणि प्रविण बोबडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. यासर्वांकडे क्वारंटाइन असलेल्यांना दोन वेळचे जेवण, चहा, नाष्ता, आदींची व्यवस्थेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यासर्वांवर नियुक्त पथकाची निगराणी राहणार आहे.कामगारांची वैद्यकीय तपासणीशास्त्री चौकात असलेल्या बच्छराज धर्मशाळेत आश्रय घेत असलेल्या दीडशे कामगारांची आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यासर्वांना जेथे आहे तेथेच थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.मजूर घेऊन जाणारे दोन वाहन अडविलेहिंगणघाट : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्याने जिह्यासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे कामगार, मजुरांनी घराकडे धाव घेतली आहे. चेन्नईवरून ग्वाल्हेरच्या दिशेने आणि हैदराबादकडून नागपूरकडे मजूर घेऊन जाणाºया वाहनांना हिंगणघाट पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग सात वरील उपजिल्हा रूग्णालय चौकात अडविले. वाहनातील सर्व मजुरांना मोहता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले असून सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या