शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे

By admin | Updated: October 13, 2016 01:27 IST

विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कार्य करावे आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या

जी.शी. टेंभूर्णे : तंत्रस्नेही व प्रेरणा कार्यशाळावर्धा : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कार्य करावे आणि शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रगत करण्याच्या दृष्टिकोनातून आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन-अध्यापन कार्यात वापर करावा. यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन न.प. शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी जी.शी. टेंभुर्णे यांनी केले.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ते न.प. शिवाजी उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित तंत्रस्नेही व प्रेरणा कार्यशाळेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न.प. केंद्र समन्वयक ज्ञानेश्वर पिसे, ज्येष्ठ मुख्याध्यापक चारुदत्त जमाने आदी उपस्थित होते.कार्यशाळेत पुढे बोलताना टेंभुर्णे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या कार्यक्रमाचा उद्देश आणि शिक्षकांची जबाबदारी समजावून सांगितली. सोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या विविध खेळांची ओळख त्यांनी याप्रसंगी करुन दिली. कार्यशाळेच्या प्रारंभी पे्ररणा देणाऱ्या काही विडीओ क्लिप्स दाखविण्यात आल्या. यावेळी न.प. च्या सर्व शाळांनी पावरपॉर्इंट प्रेझेंटेशन द्वारे शालेय उपक्रमाचे सादरीकरण केले.कार्यशाळेमध्ये तंत्रस्रेही शिक्षिका सुमन ठाकुर यांनी युट्युबबद्दल माहिती दिली. तर पदमश्री मेघे यांनी विडीओ कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन केले. संगीता कापसे यांनी अ‍ॅप कसे डाऊनलोड करावे याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर पिसे यांनी केले. संचालन गणेश पांढरे यांनी केले तर आभार निलेश गुल्हाने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुरेश पोहाणे, सुषमा नागापुरे, मनोज शुक्ला आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)