मलकापूर-दहेगाव मार्गावरील घटना : शाळा आटोपून जात होते घरीवर्धा : शाळा आटोपून घराकडे जात असलेल्या एका शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी मलकापूर-दहेगाव मार्गावर घडली. अतुल गावंडे रा. दहेगाव (स्टेशन) असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस सूत्रानुसार, जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेले अतुल गावंडे हे शाळा आटोपून घराकडे परत जात असताना मलकापूर ते दहेगाव मार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून घटनेची नोंद केली आहे.(प्रतिनिधी)
दुचाकी अपघातात शिक्षक ठार
By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST