शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री सात घरे टार्गेट; आंजी (मोठी) परिसरात चोरट्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2022 05:00 IST

आंजी (मोठी) येथील तब्बल सात घरांना टार्गेट करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हेच सीसीटीव्ही चित्रीकरण शुक्रवारी सकाळी पोलिसांनी बारकाईने तपासले. या चित्रीकरणातून मोठी महत्त्वाचीच माहिती खरांगणा पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच या चोरट्यांना जेरबंद करू असा विश्वास खरांगणा पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी या घटनेमुळे परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क आंजी (मोठी) : जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरापासून अवघ्या १७ किमी अंतरावर असलेल्या आंजी (मोठी) येथे अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल सात बंद घरांना टार्गेट केले. चोरट्यांना या ठिकाणी मोठा मुद्देमाल मिळाला नसला तरी या घटनेमुळे आंजी (मोठी) परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.आंजी (मोठी) येथील गुप्ता ले-आऊट, इंदिरानगर, मास्टर कॉलनी, बाजार चौक तसेच वॉर्ड क्रमांक ४ मधील एकूण सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची माहिती मिळताच खरांगणाचे ठाणेदार संतोष शेगावकर यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सानप, कामडी, गिरीश चंदनखेडे त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी तातडीने घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चोरट्यांनी टार्गेट केलेल्या घरांसह परिसराची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला. याप्रकरणी खरांगणा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळी उठल्यावर निदर्शनास आला चोरीचा प्रकार-    महेश दांडेकर हे घराला कुलूप लावून स्लॅबवर झोपले होते. ते शुक्रवारी सकाळी उठून घरात प्रवेश करणार तर घराचे दार उघडे असल्याचे त्यांना दिसून आले. बारकाईने पाहणी केली असता पॅन्टच्या खिशातील १ हजार ५०० रुपये चोरी गेल्याचे निदर्शनास आले, तर घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या दिवाकर गायकवाड, डॉ. प्रमोद लोहकरे, अशोक भिसे, सैयद नूर अली यांच्या घराला चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास परिसरात कुणी नसल्याची संधी साधून टार्गेट केले.

सीसीटीव्हीत झाले कैद-   आंजी (मोठी) येथील तब्बल सात घरांना टार्गेट करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. हेच सीसीटीव्ही चित्रीकरण शुक्रवारी सकाळी पोलिसांनी बारकाईने तपासले. या चित्रीकरणातून मोठी महत्त्वाचीच माहिती खरांगणा पोलिसांच्या हाती लागली असून, लवकरच या चोरट्यांना जेरबंद करू असा विश्वास खरांगणा पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. असे असले तरी या घटनेमुळे परिसरात चोरट्यांबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे.

ठसे तज्ज्ञांसह श्वान पथकाला पाचारण-    एकाच गावातील एकाच रात्री तब्बल सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची माहिती मिळताच ठसेतज्ज्ञांसह श्वान पथकाने तातडीने आंजी (मोठी) गाव गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या ठसेतज्ज्ञांनी आरोपींबाबत काही सुगावा मिळतो काय याची शहानिशा केली, तर श्वान पथकाने चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला.

सात घरांची फोडली कुलूप

-    अज्ञात चोरट्यांनी आंजी (मोठी) येथील  वाॅर्ड क्र. १ मधील गुप्ता ले-आऊटमधील दिवाकर गायकवाड, इंदिरानगर येथील सैयद नूर अली मजर अली, मास्टर कॉलनीतील अशोक बिसे, डॉ. प्रमोद लोहकरे, वॉर्ड क्र. २ भागातील बाजार चौकातील महेबूब इस्माइल शेख, वाॅर्ड क्र. ३  मधील महेश सुरेश दांडेकर, वाॅर्ड क्र. ४ मधील सुदाम महाजन यांच्या मालकीच्या घरांचे कुलूप तोडले. सातपैकी केवळ दोनच ठिकाणी चोरट्यांच्या हाती मुद्देमाल लागला.

चोरट्यांनी लाइट ऐवजी दाबली डोअर बेलची बटन-    सुदाम महाजन यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने प्रवेश मिळविताना चोरट्यांपैकी एकाने लाइटऐवजी डोअर बेलचे बटन दाबले. त्यामुळे घरातील वरच्या खोलीत झोपून असलेले सुदाम महाजन हे जागे झाले. घरात कुणीतरी असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून  यशस्वी पळ काढला.

 

टॅग्स :Thiefचोर