शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टाकळीत गुरूदेव भक्त शेतकरी आरक्षणासाठी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 22:06 IST

गुरुदेव सेवा मंडळाच्या आग्रहावरून शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित करण्यासाठीची टाकळीची ग्रामसभा ग्रामपंचायती ऐवजी गुरूदेव सेवा मंडळात आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आरक्षणाची माहिती देण्यासाठी शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते.

ठळक मुद्देरूपराव खैरकार : गुरुदेव सेवा मंडळ करणार प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गुरुदेव सेवा मंडळाच्या आग्रहावरून शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावावर ठराव पारित करण्यासाठीची टाकळीची ग्रामसभा ग्रामपंचायती ऐवजी गुरूदेव सेवा मंडळात आयोजित करण्यात आली होती. शेतकरी आरक्षणाची माहिती देण्यासाठी शैलेश अग्रवाल यांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वागतगीताने गावात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. ग्रामविकासाचे असेच उपाय शैलेश अग्रवाल यांनी शेतकरी आरक्षणाच्या प्रस्तावातून देशाला सुचविलेले आहेत, यामाध्यमातून ते राष्ट्रसंतांच्या विचारांवरच कार्य करीत असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे रूपराव खैरकार यांनी मांडले.शासनाने या प्रस्तावावर अंमलबजावणी करावी यासाठी टाकळी ग्रामसभा या ठरावाच्या माध्यमातून मागणी करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांनी सांगीतले. ग्राम पंचायत सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला व सर्व ग्रामस्थांच्या एकमताने ठरावास मंजूरी देण्यात आली.यावेळी बाबाराव सावरकर, विलास दरणे, प्रदीप खैरकार, प्रशांत घुमे, गजानन सावरकर व भारत एकोणकार यांनी शेतकरी आरक्षणाच्या उपयोगितेवर विचार व्यक्त केले व गावोगावी याविषयी गुरूदेव सेवा मंडळ प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.