शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा

By admin | Updated: May 20, 2017 02:16 IST

शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी जयश्री रामटेके यांच्यावर दारूविक्रेत्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले.

एसपींना निवेदन : महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी जयश्री रामटेके यांच्यावर दारूविक्रेत्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. हा प्रकार निंदनिय असल्याचा आरोप करीत सदर घटनेतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक निर्मला देवी एस. यांना दिलेल्या निवेदनातून प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. निवेदनातून, महिला पोलीस अधिकारी रामटेके या कर्तव्यावर असताना वर्धा शहरातील इतवारा परिसरात दारूबंदी मोहीमेंतर्गत छापा घालण्याकरिता गेल्या असता त्यांच्यावर दारू विक्रेत्यांनी हल्ला केला. या संपूर्ण प्रकाराचा प्रहार संघटा निषेध करते. जयश्री रामटेके यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. हा हल्ला केवळ त्या महिला पोलीस अधिकाऱ्यांवरील नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेवर केलेला हल्ला आहे. सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक या नात्याने आपण स्वत: जातीने लक्ष देत पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून योग्य पाऊल उचलण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दारूविक्रेत्यांकडून आतापर्यंत दारूबंदीसाठी काम करणाऱ्या महिलांवर हल्ले करण्यात आल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्याही दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जीवाचा आटापिटा करीत पोलिसांना सहकार्य करतात. परंतु, त्याचेच गॉडफादर अशी ओळख असलेल्या वर्धा पोलिसांवर असे हल्ले होत असतील तर सहाजिकच ते निंदनिय आहे, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. दारूविक्री व्यवसायाला सामान्य नागरिकांसह महिलांना किती त्रास होतो याची कल्पनाच न केलेली बरी. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गेलेल्या एका कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला म्हणजे शांतीप्रिय जिल्ह्याला काळीमा फासणाराच प्रकार असल्याचे निवेदनात नमुद आहे. निवेदन देताना विकास दांडगे, राजू लढी, प्रशांत गोडखांदे, आदित्य कोकडवार, मयूर ढाले, नावेद बैग, आकाश दांडगे, रोशन दाभाडे, नितीन काटकर, दादा बोरकर आदींची उपस्थिती होती.