शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सत्कारापेक्षा समाजकार्याचा वसा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 21:55 IST

समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे.

ठळक मुद्देसिंधुताई सपकाळ : पिपरी (मेघे) येथे अभिष्टचिंतन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाज, कुटुंबाने ज्यांना नाकारले आहेत. जे अनाथ झाले आहेत. अशा अनाथांसाठी कार्य करताना मी ज्या रस्त्याने भीक मागत फिरत होते. ज्या ठिकाणाहून मला समाजाने नाकारले होते. त्याच ठिकाणी माझा सत्कार होत आहे. याचा मला अभिमान आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.पिपरी (मेघे) येथील सासर-माहेर समितीच्यावतीने ७१ व्या अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, शंकरप्रसाद अग्निहोत्री, अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे उपस्थितीत होते. खासदार तडस म्हणाले, आईने अनाथांसाठी केलेले कार्य शब्दात सांगता येणार नाही. त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, यासाठी मी सरकारकडे मागणी करणार आहे, असेही ते म्हणाले. माजी खासदार दत्ता मेघे म्हणाले, माझ्या नागपूर येथील साई अनाथ आश्रमामध्ये ६० मुले आणि वर्धा येथील आश्रमात ३५ मुली आहेत. त्यांचे शिक्षण, पालनपोषणाचा खर्च माझ्या संस्थेतर्फे करण्यात येतो. याची प्रेरणा मी सिंधू यांच्या पासूनच घेतली आहे. यावेळी बोलताना सिंधूताई सपकाळ म्हणाल्या की आजपर्यंत २२ देशांमध्ये माझा सत्कार झाला. मी ज्या देशात जाते आणि जिथे माझा सत्कार करण्यात येतो. तेथे वास्तव्यास राहणारे मराठी लोक येऊन मला जय महाराष्ट्र म्हणतात. तेव्हा मी महाराष्ट्राची लेक-सून असल्याचा मला अभिमान वाटतो. आता सत्कार करण्यापेक्षा मी केलेल्या समाजकार्याचा वसा घ्यावा, असे भाविक आवाहन त्यांनी केले. संचालन संदीप चिचाटे तर मनीष बोपटे यांनी आभार मानले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस