मागणी : अनेकजण मतदानापासून वंचित वर्धा : बोरगाव (मेघे) सर्कल अंतर्गत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अनेक उमेदवार रिंगणात होते. निवडणूक प्रक्रियेनुसार मतदारांची फेरतपासणी करून अंतिम मतदार यादी जाहीर करणे ही संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र १६ फेब्रुवारीला झालेला मतदान प्रक्रियेत यादीतील घोळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहिले. मतदार यादीतील येथील नागरिकांना मुलभूत हक्क बजावता आला नाही. मतदानाकरिता अनेकांना पायपीट करावी लागली. मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे येथे अल्प प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून येते. मतदार यादी तयार करताना असा घोळ घालाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. निवेदन देताना पंकज सायंकार, सरपंच योगिता देवढे, ग्रा.पं. सदस्य नितीन डफळे, दुर्गा ताजने, सुनिता मेघे, संदीप क्षीरसागर, गणेश देवढे, मंगेश बुरसे, निलेश ठाकरे, आकाश लाकडे, रामदास शेंडे आदी उपस्थित होते. मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्यास अधिकाऱ्यांचा गलथानपणा कारणीभूत आहे, असा आरोप करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)
मतदार यादीत घोळ करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Updated: February 22, 2017 00:55 IST