शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

स्वामी विवेकानंद उच्च कोटीतील दर्शनिक होते

By admin | Updated: October 11, 2016 02:32 IST

स्वामी विवेकानंदांना हिंदुत्ववादी विचार सरणीतील लोकांनी हिंदुत्ववादी सन्यासी करून विवेकवादी, समतावादी,

दत्तप्रसाद दाभोळकर : १९ व्या शतकातील विवेकानंद विषयावर व्याख्यान वर्धा : स्वामी विवेकानंदांना हिंदुत्ववादी विचार सरणीतील लोकांनी हिंदुत्ववादी सन्यासी करून विवेकवादी, समतावादी, समाजवादी, धर्मनिरपेक्षता याबद्दलचा त्यांचा दृष्टीकोन समाजातून पूर्णपणे हद्दपार करून त्यांना भगवेवस्त्र धारण करणारा सन्यासी बनविले; पण विवेकानंद भारतातील जातीव्यवस्था, कर्मकांड, गरीबी, महिलांची दुरवस्था, शेतकरी मजूर यांची हलाखीची स्थिती याला जबाबदार पुरोहित व ब्राह्मणशाही व्यवस्था या सर्वांवर सडेतोड विचार व्यक्त करीत होते. ते खऱ्या अर्थाने उच्च कोटीतील दर्शनिक होते, असे मत ‘शोध स्वामी विवेकानंदाचा’ पुस्तकाचे लेखक, शास्त्रज्ञ, ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व तालुका शाखा, अनेकांत स्वाध्याय मंदिर, राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने व निर्माण फाऊंडेशन आणि नई तालिम संघ सेवाग्राम यांच्या सहकार्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर विचार व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिर सभागृहात करण्यात आले. यावेळी ‘१९ व्या शतकालीत विवेकानंद’ विषयावर डॉ. दाभोळकर शोध विवेकानंदांचा या त्यांच्या ग्रंथरूपात लिहलेल्या पुस्तकाच्या संदर्भाने मार्गदर्शन करीत होते. मंचावर अनेकांत स्वाध्याय मंदिरचे अध्यक्ष डॉ. महावीर पाटणी, सचिव अरुण चवडे, गांधीवादी कार्यकर्ते रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ, महाराष्ट्र अनिसचे सचिव डॉ. सिद्धार्थ बुटले उपस्थित होते. पूढे बोलताना डॉ. दाभोळकर यांनी तारखेसह अनेक दाखले देऊन विवेकानंद २ नोव्हेंबर १८९३ ला आपल्या पत्रात म्हणतात, धर्मवेडा सारखा मनाला होणार दुसरा भयावह रोग नाही. मी धर्माचे वेड पांघरलेला एक विचारवंत आहे. ३ मार्च १८९४ च्या पत्रात ते म्हणतात, सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काही अधिकार नाही. यावरून विवेकानंद समाजवादी आहे. परिवर्तन व अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील अग्रदूत आहे. फक्त सुशिक्षित हिंदुमध्ये आढळून येणाऱ्या धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक, नास्तिक, भेकडामधील एक बनून मी जगावे, यासाठी जन्माला आलो नाही. शुद्रांची, कामगारांची, आर्थिक स्थिती सुधारेल, त्यांचा दर्जा सुधारेल, शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार होईल, असे ही स्वामी विवेकानंद म्हणतात. बेलूर मठात १८९८ ला विवेकानंद म्हणतात, जे धर्मगुरू आज सत्वगुणी म्हणून मिरवताहेत, त्यातील ९० टक्के खरेतर तमोगुणी आहे. आता आपण या देशातील लोकांना मांस, मासे खाऊन कार्यप्रवण करण्याची गरज आहे. पूढे कोणत्याही शास्त्रावर विश्वास ठेवू नको, वेद थापाडे आहेत, असे देवीवणी मासिकातून विचार सांगतात, हे दाखल्यांनी पटवून दिले. संचालन डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले तर आभार प्रकाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयूर डफळे, विजय कडू, भीमसेन गोटे, गजेंद्र सुरकार, भरत कोकावार, सुनील ढाले, सारिका डेहनकर, अमिर अजानी यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी) ४१० जून १८९८ ला मोहम्मद सर्फराज हुसेन यांना पाठविलेल्या पत्रात विवेकानंदांनी आपल्याला नवा धर्म, नवा देव आणि नवा वेद हवा आहे. कारण, आपल्याला नवा भारत घडवायचा आहे, असे स्वामी विवेकानंदांनी नमूद केले होते. यावरही दाखले देत खरा विवेकानंद डॉ. दाभोळकर यांनी समजावून सांगितला.