शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.च्या उपसभापतीपदी काँग्रेसच्या सुवर्णा भोयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 23:48 IST

स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

ठळक मुद्देदोन मतांनी विजय : पं.स.सभागृहात पार पडली विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : स्थानिक पंचायत समितीच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांनी विजय संपादीत केला. त्यांना भाजपाचे उमेदवार डॉ. विजय परबत यांच्यापेक्षा दोन मत जास्त मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.भाजपाचे पं. स. उपसभापती धनंजय रिठे यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पं.स.च्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसूल अधिकारी समाधान शेंडगे होते. त्याच्या अध्यक्षतेत विशेष सभा पार पडली. उपसभापती पदासाठी काँग्रेसच्या कांनगाव गणाच्या सदस्या सुवर्णा भोयर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर सत्तारूढ भाजपाच्यावतीने डॉ. विजय परबत यांनी उमेदवारी दाखल केली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या सुवर्णा भोयर यांना आठ मत तर डॉ. परबत यांना सहा मत पडली. भोयर यांना सर्वाधिक मत मिळाल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केले. सदर विजयानंतर सुवर्णा भोयर यांच्या समर्थकांसह काँग्रेस व राकाँच्या पदाधिकाºयांनी विजय साजरा केला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे, माजी आमदार राजू तिमांडे, ज्येष्ठ सहकार नेते अ‍ॅड. सुधीर कोठारी, शेतकरी संघटनेचे मधुसूदन हरणे यांच्या उपस्थितीत सुवर्णा भोयर यांचा सत्कार करण्यात आला. हिंगणघाट पंचायत समितीत सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाला सत्ता मिळविता आली. परंतु, या उपसभापतीच्या पोट निवडणुकीत काँग्रेस, राकाँ, शिवसेना व शेतकरी संघटना एकत्र आल्याने भाजपाला पराभवाचे मुख बघावे लागले आहे. शिवाय मोठा धक्काच बसल्याचे बोलले जात आहे. दीड वर्षांपूर्वी झालेल्या पं.स.च्या निवडणुकीत भाजपला सात जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस ३, राकाँ २, सेना व शेतकरी संघटनेला प्रत्येकी एक जागेवर विजय मिळविला होता. त्यावेळी समान मत मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती. यात सभापती व उपसभापती हे दोन्ही पद भाजपाकडे गेले होते. परंतु, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.त्या वेळी मिळाला होता ईश्वर चिठ्ठीने विजयपं.स.च्या सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी झालेल्या सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीत समसमान सात मत पडल्याने शेवटी विजयाचा विषय ईश्वर चिठ्ठीने मार्गी लावण्यात आला होता. यावेळी भाजपाचे दोन्ही उमेदवार ईश्वरचिट्ठीने विजयी झाले होते. उपसभापती रिठे यांचे निधन झाल्याने निवडणूक घेण्यात आली. यात भाजपाला धक्काच बसला.