सेलू : स्थानिक सूर्यधरम ग्रामीण स्पोर्टिंग असोसिएशनच्यावतीने बुधवारी जिल्हास्तरीय दौड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सुमारे ३०० च्या वर धावकांनी सहभाग घेतला.गत दहा वर्षांपासून ग्रामीण भागातील युवकांत खेळाबाबत जागृती निर्माण करून त्यांना क्र्रीडा संस्कृतीत सामावून घेण्याचे प्रयत्न येथील सूर्यधरम ग्रामीण स्पोर्टींग असोसिएशनद्वारे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गजू ऊर्फ भीमबहादूर ठाकूर यांच्या स्मृत्यर्थ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन वर्धा जिल्हा अॅथेलेटिक्स असोसिएशनचे सचिव रमेश बुटे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. संदीप काळे तर अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे समन्वयक संजय माटे, सुवासिनी वंजारी, पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पवार यांच्यासह अनंत भाकरे, रामप्रसाद लिल्हारे, प्रवीण इंगळे, राजेश जयस्वाल, प्रा. चामचोर, अनिलकुमार चौधरी, किशोर धुर्वे, दिलीप खडसे, विनायक भांडेकर, रवींद्र सोनटक्के आदी उपस्थित होते. स्पर्धेत आठ किमी मुलांच्या खुल्या गटात सुरज टवलारे, किरण गाते, तनवीर शेख, सुरज भावरकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावले तर पाच किमी मुलींच्या खुल्या गटात पूजा कटरे, सुषमा हटवार, निखिता मापारी यांनी पुरस्कार पटकाविले. १६ वर्षांच्या आतील मुलांच्या गटात निखिल धोटे प्रथम, मयूर बोकडे द्वितीय, विशाल मोहर्ले तृतीय व आशिष काळे यांनी चतुर्थ तर बारा वर्षांच्या आतील मुलांच्या गटात प्रज्वल सोनटक्के यांनी प्रथम तर मुलींच्या गटात वैष्णवी नागपुरे प्रथम व राणी कोल्हे हिने द्वितीय पुरस्कार पटकावले. प्रास्ताविक भाकरे यांनी केले. संचालन निसार सय्यद यांनी केले तर आभार प्रवीण इंगळे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)
सूर्यधरम जिल्हास्तरीय दौडमध्ये धावले ३०० च्या वर स्पर्धक
By admin | Updated: September 27, 2015 01:44 IST