लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांची शनिवारी स्थानिक विकास भवन येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक आयोजित केली होती; पण संघटनेच्या एका गटातील तब्बल सहा मतदारांना विविध कारणे पुढे करीत मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याने या गटातील सर्व सदस्यांनी सभागृहा बाहेर येत निवडणूक प्रक्रियेत दडपशाहीचा अवलंब केल्या जात असल्याचा आरोप करीत जोरदार घोषणाबाजी करून सदर प्रक्रियेबाबत निषेध नोंदविला.राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे जिल्ह्यात एकूण ७१७ सभासद आहेत. नवीन कार्यकारिणी निवडत असताना मतदार म्हणून घेण्यात आलेल्यांची निवड करताना सरासरी दहा सभासदामागे सर्वानुमते एकाची निवड करण्यात आली. त्याच अनुषंगाने ११० सभासदांना मतदार म्हणून निवडण्यात आले. याच मतदारांकडून आज नवीन कार्यकारिणीसाठी सभेदरम्यान मतदान घेण्यात आले. सभा व मतदान प्रक्रिया सुरू असताना एका गटाने सेवानिवृत्त असलेल्या एका नायब तहसीलदारांवर विविध आरोप करीत आमच्या गटातील मतदारांना हेतूपुरस्कर मतदानापासून डावलण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर मेंबरशीपच्या नावाखाली वेठीस धरत निवडणूक प्रक्रियेत दबाब तंत्राचा वापर केल्या जात असल्याचा आरोप करीत सभागृहा बाहेर निघण्याचे पसंत केले. त्यानंतर सभागृहाबाहेर निघालेल्या सुमारे ११० महिला व पुरुष सभासदांनी जोरदार घोषणाबाजी करून आमचा मतदान प्रक्रियेवर बहिष्कार असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून दबाव तंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणाºयांचा निषेध केला. संघटनेच्या प्रभारी राज्यअध्यक्षांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणीही यावेळी केली.
नव्या निवड प्रक्रियेत दडपशाहीचा अवलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:23 IST
राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सभासदांची शनिवारी स्थानिक विकास भवन येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. याच सभेत नवीन कार्यकारिणीसाठी निवडणूक आयोजित केली होती; पण संघटनेच्या एका गटातील तब्बल सहा मतदारांना....
नव्या निवड प्रक्रियेत दडपशाहीचा अवलंब
ठळक मुद्देबहिष्कार टाकणाऱ्यांचा आरोप : सभागृहाबाहेर पडून केली जोरदार घोषणाबाजी