शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट औषध पुरवठा; अखेर अॅक्वेंटिस अन् काबीसविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:53 IST

मोठे 'रॅकेट' अडकण्याची शक्यता : सव्वासहा लाख टॅबलेटचा झाला होता पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सामान्यांसाठी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची गंभीर बाब अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान उजेडात आली होती. याबाबतचे वृत्त ४ ऑगस्ट रोजी 'लोकमत'ने प्रकाशित करून वाचा फोडली होती. अखेर या प्रकरणात अन्न औषध निरीक्षकांच्या तक्रारीनुसार अॅक्वेंटिस, काबीज या दोन पुरवठादारांसह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

एफडीएच्या चौकशीत तब्बल सहा लाख ३० हजार बनावट टॅबलेट्सचा रुग्णालयांना पुरवठा झाल्याची बाब उजेडात आली आहे. राज्यातील नागपूरसह काही जिल्ह्यांत बनावट औषधांचा साठा पकडला होता. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध भंडारातून २० सप्टेंबर २०२३ रोजी काही औषधांचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान अॅझिमसिन बँडनेम असलेल्या औषधात अॅझिश्रीमायसिन हा मुख्य घटक आढळून न आल्याने अहवालाअंती अन्न व औषध प्रशासनाने हे औषध बनावट घोषित केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाला या औषधाचा पुरवठा कोल्हापुरातील सुरेश दत्तात्रय पाटील मे, विशाल एन्टरप्राइजेस या कंपनीकडून झाल्याचे सांगण्यात आले. या औषधाचे उत्पादन ग्रीस्टल फॉम्युलेशन्स, प्लॉट क्रमांक एन ९९/२२ कोटद्वार, पौरी गर्हवाल, उत्तराखंड येथे झाले. त्याचा बॅच क्रमांक एएमटीक्यू /६७२०२२ आहे. चौकशीअंती या बनावट औषधांचा एकट्या वर्धा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पुरवठा झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण साठा ताब्यात घेतला. तक्रारीनंतर ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी, संचालक काबीज जेनरीक हाउस, गाळे क्रमांक २२, एल- १/२/३, पूनम विहार, शांतीनगरसमोर, सेक्टर-२ अयप्पा स्वामी टेम्पलजवळ, मीरा रोड, तसेच मिहीर त्रिवेदी, मे अॅक्वेंटीस बायोटेक प्रा.लि. हाउस नं.७९९/३ मुद्रा कम्पाउंड, नारकोली, भिवंडी या दोन पुरवठादारांविरुद्ध, तसेच सुरत, दिंडोली येथील में. फार्मासिक्स बायोटेकच्या मालक प्रिती सुमित त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट औषधांचा कारखाना भिवंडी अन् ठाण्यातफेब्रुवारी महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने गती राज्यभरात तपासणी मोहीम राबविली. देत संपूर्ण अनेक ठिकाणांहून औषधांचे नमुने घेण्यात आले होते, एफडीए ने जिल्हा सामान्य रुग्णाल यातून घेतलेल्या नमुन्यात अॅझिमिसिन असे अॅडनेम असलेल्या औषधामध्ये अॅनिश्रोमायसिन हा मुख्य घटकच आढळून न आल्याने हे औषध बनावट घोषित केले. हा पुरवठा भिवंडी, ठाणे येथून झाल्याने भिवंडी, ठाणे येथेच बनावट औषधी तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघड झाले आहे. 

सखोल तपास केल्यास आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश बनावट औषध निर्मिती व विक्रीचे जाळे हे उत्तरांचल, तसेच हिमाचल येथे असल्याची माहिती आहे. या मागे आंतर- राज्यीय टोळी असून, या औषधांची निर्मिती कोठे झाली व त्यासाठी लागणारा कच्चामाल, पॅकिंग मटेरियल आदी साहित्य कोठून आणले, कोठे बनावट औषधांची विक्री झाली, याबाबतचा सखोल तपास पोलिसांनी केल्यास मौऊग रॅकेटचा पर्दाफाश होणार, यात शंका नाही.

टॅग्स :wardha-acवर्धाMedicalवैद्यकीय