लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/विरूळ (आकाजी) : दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. प्रीती सत्यदेव राजपूत (२२) रा. रामपूर आणि श्वेता प्रशांत ढेपे (३३) रा. जाम, असे मृत महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.जाम येथील रहिवासी असलेल्या श्वेता प्रशांत ढेपे (३३) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी श्वेताचे कुटुंबीय झोपेतून उठल्यावर तिने आत्महत्या केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर, एएसआय गजानन कोपरकर, नीरज वैरागडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. शिवाय पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. विशेष म्हणजे, श्वेता हिचे दोन महिन्यांपूर्वी प्रशांतशी लग्न झाले होते. श्वेताने कुठल्या मानसिक दडपणाखाली येत आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला, याचा पोलीस शोध घेत आहेत. तर दुसरी घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर येथे घडली. विरुळपासून जवळ असलेल्या रामपूर येथील प्रीती सत्यदेव राजपूत यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना लक्षात येताच पुलगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. घटनेची पुलगाव पोलिसांनी नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.रेल्वे उड्डाणपुलाखाली आढळला मृतदेहवर्धा : म्हसाळा भागातील रेल्वे उड्डाणपुलाखाली एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद सेवाग्राम पोलिसांनी घेतली असून वृत्तलिहिस्तोवर मृताची ओळख पटली नव्हती.
दोन विवाहित महिलांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:46 IST
दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन विवाहित महिलांनी आत्महत्या केली. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. प्रीती सत्यदेव राजपूत (२२) रा. रामपूर आणि श्वेता प्रशांत ढेपे (३३) रा. जाम, असे मृत महिलांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन विवाहित महिलांची आत्महत्या
ठळक मुद्देपरिसरात खळबळ : रामपूरसह जाम गावावर शोककळा