शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

गॅस ग्राहकांच्या खात्यात जमा होणार अनुदान होणार

By admin | Updated: November 12, 2014 22:48 IST

गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम १५ नोव्हेंबर पासून जमा होणार आहे़ गॅस ग्राहकांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचतखाते तसेच आधारकार्ड असणे आवश्यक असून अद्यापपर्यंत आधारकार्ड व बचतखाते

वर्धा : ^ गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम १५ नोव्हेंबर पासून जमा होणार आहे़ गॅस ग्राहकांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचतखाते तसेच आधारकार्ड असणे आवश्यक असून अद्यापपर्यंत आधारकार्ड व बचतखाते नसलेल्या ग्राहकांनी तत्काळ बचत खाते व आधारकार्ड काढण्याचे जिल्हाधिकारी एऩनवीन सोना यांनी कळविले आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात केंद्र शासनाच्या एमडीबीटीएल योजनेंतर्गत १५ नोव्हेंबर पासून अनुदानाची रक्कम थेट बँकेत जमा करण्याच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी एऩनवीन सोना यांनी आढावा घेतला, त्याप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक अनंत भिसे, भारत पेट्रोलियमच्या मिश्री कोटकर, हिंदुस्थान पेट्रोलियमचे लोकेश सक्सेना व इंडियन आॅईलचे वरिष्ठ अधिकारी जयंत पाटील उपस्थित होते़ केंद्र शासनाने एलपीजी ग्राहकांना अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या बचतखात्यात १५ नोव्हेंबर पासून जमा करण्याचा निर्णय घेतला असून, वर्धा जिल्ह्यातील २ लक्ष २२ हजार ४४३ गॅस ग्राहकांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. या बाबत माहिती देताना जिल्हाधिकारी एऩनवीन सोना म्हणाले की, जिल्ह्यात २२ गॅस वितरकांकडून सिलिंडरचा पुरवठा सुरू आहे़ गॅस ग्राहकांना आधारकार्ड व बँक खाते आवश्यक करण्यात आल्यामुळे २ लक्ष ४ हजार ६८९ ग्राहकांनी आधारकार्ड काढले आहे़ १ लक्ष ८५ हजार ०५ ग्राहकांची राष्ट्रीयकृत बँकेत बचतखाते असून ते एजन्सीसोबत संलग्न आहे़ गॅसच्या अनुदानाची रक्कम थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होण्याच्या दृष्टीने अद्यापपर्यंत बँक खाते उघडले नाही त्यांनी प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत जवळच्या बँकेत खाते उघडावे तसेच आधारकार्डसुद्धा येत्या तीन महिन्यात काढून गॅस अनुदानासाठी गॅस वितरकांकडे जमा करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यात इंण्डेन आॅईल कंपनीचे ११ वितरक, भारत पेट्रोलियमचे तीन तर एचपीसीएलच्या आठ वितरकामार्फत गॅसचा पुरवठा सुरू आहे़ आॅईल कंपन्यांनीही गॅस ग्राहकांना आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडण्यासाठी मार्गदर्शन करावे़ १४ नोव्हेंबर पर्यंत ज्या ग्राहकांचे बँक खाते नाहीत त्यांना बँकेत बचतखाते सुरू करण्यासंबंधी राष्ट्रीयकृत बँकासोबत समन्वय करून बचत खाते उघडण्यास अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बचत खात्यात जमा होऊ शकेल़ आधार संलग्न असलेल्या गॅस वितरकाकडे आधारकार्ड अनुदानासाठी संलग्न झाले आहेत़ जिल्हा पुरवठा अधिकारी सवाई यांनी जिल्ह्यातील अनुदानाबाबत सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली़(प्रतिनिधी)