शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

गारपिटग्रस्तांचा नुकसानीचा निधी त्वरित खात्यात जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:36 IST

मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकºयांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या सूचना विविध विषयावर आढावा बैठक

आॅनलाईन लोकमतवर्धा : मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी त्वरित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, खातेप्रमुख उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांनी सेवाग्राम विकास आराखड्याच्या प्रथम टप्प्यात पाच कामे प्रगतिपथावर असून सभागृह, यात्रीनिवासची टाकी, संरक्षण भिंत, धाम नदीची एक बाजू तथा यात्री निवास येथील पार्किंगचे काम सुरू असल्याचे सांगितले.यावर आयुक्तांनी मे २०१८ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तिसºया टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षी ६० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. एकूण ८५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले. गौण खनिज, रेतीघाट आदींचा महसूल गोळा करून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, विविध विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण करावे, स्वयंसेवी संस्थानी वृक्ष जोपासण्याची जबाबदारी घेत अशाच ठिकाणी वृक्ष लागवड करावी. वन विभागाने झुडपी जंगल जमिनीचा कलम ४ नुसार वृक्ष लागवडीकरिता वापर करावा अशाही सूचना त्यांनी दिल्या. शेतीपूरक अभियानांतर्गत मत्स्य उत्पादन, तलाव तेथे मासोळी, मच्छीयुक्त तलाव, फिशनर्सरी, बोटुकली निर्माण करणे, दुग्धव्यससाय, कुक्कुटपालन, चारा उत्पादन, रेशीम तुती लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी केलेल्या उपाययोजनांची अनुपकुमार यांनी माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरीबाबतही आढावा घेण्यात आला.मायक्रो एटीएमचा उपयोग करण्याचे आवाहनमायक्रो एटीएम ही सुविधा घरपोच व गावात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा आधार लिंक असून यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. नागरिकांना थंबद्वारे व्यवहार करता येतात. ही सुविधा गावात व घरपोच उपलब्ध असल्याने नागरिकांना शहरात जाऊन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची गरज नाही. यासाठी नागरिकांनी मायक्रो एटीएम सेवेचा उपयोग करून लाभ घ्यावा, असे आवाहन सेलू तालुक्यातील बोरी येथे मायक्रो एटीएमच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.जिल्हा नियोजन समिती व आयडीएफसी बँक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, तहसीलदार महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, देवकुमार कांबळे, नायब तहसीलदार श्याम कावटी, मनीष कावडे, हेमंत काकडे, मंडळ अधिकारी सायरे उपस्थित होते.बँक सुविधा सुरळीत व्हावी, आपले आधार आपली बँक या सुविधेंतर्गत ही सेवा गावस्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बँक खाते उघडणे, पैसे काढणे व भरणे, निराधार, विधवा, राजीव गांधी पेन्शन, शिष्यवृत्ती रक्कम काढणे आदी कामे केली जाते. यामुळे वेळ, श्रम व बुडणारी मजुरीची वाचेल, असेही अनुपकुमार यांनी सांगितले.