आशुतोष सलील : सर्व नोंदी स्वत: तपासून घेण्याच्या सूचनावर्धा : जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच संगणकीकृत शिधापत्रिका तयार होणार आहेत. रास्तभाव दुकानामार्फत प्रिप्रिटेंड यापूर्वी भरून दिलेले अर्ज शिधापत्रिका धारकांपर्यंत पोहोचविण्यास देण्यात आलेले आहेत. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाने प्रिप्रिटेंड अर्ज संबंधित स्वस्त धान्य दुकानादाराकडून प्राप्त करून घ्यावेत व त्यावरील सर्व नोंदी स्वत: तपासून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे.भरून दिलेले अर्ज संबंधित रेशन दुकानदाराने १५ आॅक्टोबरपर्यंत जमा करावेत. या बाबत काही अडचण असल्यास संबंधित रेशन दुकानदार, तलाठी, तहसीलदार अथवा जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क करावा, असेही ते म्हणाले.अर्जावरील कुटुंबातील सर्व व्यक्तीचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, शिधापत्रिकेतील ज्येष्ठ महिला सदस्यांचे छायाचित्र, गॅसबाबत व इतर सर्व माहिती स्वत: भरलेली तपासून घ्यावी. त्यात काही बदल करावयाचा असल्यास शिधापत्रिकाधारकाने स्वत: करून व स्वाक्षरी करून संबंधित रेशन दुकानदाराकडे जमा करावे. याच माहितीच्या आधारे नवीन शिधापत्रिका तयार होणार असल्याने माहिती बिनचूक असल्याची स्वत: खात्री करावी. संगणीकरणाचे फॉर्म भरून दिलेल्या कार्डधारकांस यापुढे अन्नधान्य, साखर, करोसीन मिळणार आहे. जे शिधापत्रिकाधारक अर्ज भरून देणार नाही. त्यांना शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ मिळू शकणार नाही. कार्डधारकांनी भरून दिलेल्या माहितीच्याच आधारे नवीन संगणकीय रेशन वाटप प्रणाली सुरू होणार आहे. तसेच राजीव गांधी जीवनदायी व इतर योजना देखील भविष्यात संगणकीय शिधापत्रिकांशी जोडल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.(शहर प्रतिनिधी)या कार्डवरच धान्य व रॉकेलसंगणीकरणाचे फॉर्म भरून दिलेल्या कार्डधारकांस यापुढे अन्नधान्य, साखर, करोसीन मिळणार आहे. जे शिधापत्रिकाधारक अर्ज भरून देणार नाही. त्यांना शासनाच्या इतर योजनांचा देखील लाभ मिळू शकणार नसल्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
संगणकीकृत शिधापत्रिकांचे अर्ज त्वरित जमा करा
By admin | Updated: October 7, 2015 00:51 IST