शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
3
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
4
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
5
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
6
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
7
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
8
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
9
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
10
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
11
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
12
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
13
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
14
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
15
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
16
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
17
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
18
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
19
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
20
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...

दुबार पेरणीचे सावट गडद

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती.

पिके आॅक्सिजनवर : जमिनी पडल्या कोरड्यावर्धा : दोन ते तीन वर्षांपासून मृगाचा पाऊस बरसलाच नव्हता. त्यानंतरची नक्षत्र मात्र बळीराजाला साथ देत होती. यंदा मात्र मृगातच पावसाने दमदार हजेरी लावली. शेतकरी पेरता झाला. रोप अंकुरली. पण ती बहरण्यासाठी पाऊस परतलाच नाही. दरवर्षी साथ देणारे आर्द्रा नक्षत्र यंदा पूर्णत: कोरडे गेले. त्यामुळे आकाशाकडे पावसाची वाट पाहात असलेल्या बळीराजाच्या डोळ्यातच आता पाऊस दाटला आहे. रोज दुपारी ढग दाटून येतात. गार हवेची झुळकही पसरते. पण आलेले ढग पुन्हा काही वेळातच विरून जातात. महिनाभरापासून हीच स्थिती असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट घोंगावत आहे. यंदाच्या खरीपातील पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात एकूण ४ लाख २० हजार हेक्टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ लाख ३७ हजार हेक्टर जमिनीवर कापसाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. १ लाख ८१ हजार हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत कापसाची ७६.२० टक्के पेरणी झाली. यात हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ४२ हजार १५८ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली. त्याचप्रमाणे १ लाख १० हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार ५२७ हेक्टरवर म्हणजेच ७७.७५ टक्के पेरणी आतापर्यंत झालेली आहे. या दोंंन्ही पिकांमध्ये आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ६०० हेक्टरवर तूरपिकाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ३९ हजार ६५० हेक्टरवर म्हणजेच ६० टक्के पेरणी आटोपली आहे. चांगला पाऊस झाल्यावरच पेरणी करण्याचा सल्ला जिल्हा कृषी विभागाने दिला होता. त्यानुसार सतत चार दिवस मृगाचा पाऊस बरसल्यावरच शेतकरी पेरता झाला. परंतु त्यानंतर पावसाने मारलेली दडी दुबार पेरणीचे सावट गडद करीत आहे. जिल्ह्यात केवळ १० टक्केच क्षेत्र हे पूर्ण ओलिताखाली असून ९० टक्के जमीन ही कोरडवाहू क्षेत्रातील आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पिके कशी जगवावी, हा प्रश्न पडला आहे. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भारनियमनाने ग्रासले आहे. दिवसभर वीज राहात नसल्याने पिकांना रात्र जागून ओलित करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच पाणीही पुरत नसल्याचे शेतकरी सांगत आहे. आता पाऊसच या संकटातून वाचवू शकत असल्याची भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)कुठल्याही स्थितीत पीक जगणे महत्त्वाचेओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांना तितकीशी चिंता नसली तरी कोरडवाहू शेतकरी मात्र संकटात सापडले आहे. त्यातही विहिरीद्वारे ओलित असलेल्या शेतकरी वर्गालाच सिंचन करता येत आहे. त्यामुळे कालव्यांद्वारे जेथे सिंचनाची सोय करता येत असेल तेथे पाठबंधारे विभागाने किमान एक पाणी देता येईल एवढी सोय करणे गरजेचे आहे. त्यामुळे आणखी काही दिवस पाऊस नाहीच आला तरी देखील पिके जगू शकतील. कालव्यांतून जेवढे पाणी सोडता येईल तेवढे पाणी सोडण्याची गरज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्यक्त केली. शेवटी जमेल तेवढी पीक जगणे महत्वाची असल्याचे ते म्हणाले.