शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा

By admin | Updated: September 5, 2016 00:35 IST

येथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे.

रिक्त पदांमुळे ट्रामा केअर कुचकामी : रोज होते १,५०० बाह्यरुग्णांची नोंद भास्कर कलोडे हिंगणघाटयेथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे. शंभर खाटांचे रुग्णालय २४ तास सेवा देणारे असून येथे नित्याला १ हजार ५०० बाह्यरुग्णांची तपासणी होत आहे. या चार डॉक्टरांच्या भरोशावर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. असे असले तरी कार्यरत डॉक्टरांवर अतिरिक्त सेवेचा त्रास व तालुक्यातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे जिल्हा प्रशानानाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्ली चैन्नई रेल्वे मार्गावर आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, उमरेड, पांढरकवडा, वर्धा या जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. मोठे शहर, मोठी बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. शहराची लोकसंख्या रुग्णसंख्या, अपघाताचे प्रमाण त्यानुसार सर्वपरी उपचारासाठी पूर्ण क्षमतेने डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक आहे; परंतु केवळ चार डॉक्टर शंभर खाटांच्या या रुग्णलयात २४ तास सेवा देत आहेत. उपलब्ध डॉक्टरांपैकी एक डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ, दोन डॉक्टर भूलतज्ज्ञ व एक एमबीबीएस आहे. अशास्थितीत त्वचारोग, नेत्ररोग, बालरोग, प्रसुती, शस्त्रक्रिया, साथीचे आजार, आकस्मिक सेवा व अपघाती रुग्णांना तातडीचे उपचार शक्य होत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची यामुळे योग्य प्रमाणात अमंलबजावणी होत नाही. रक्तपेढी असून आकस्मिक वेळी रक्त मिळत नाही. या रुग्णालयात अद्ययावत एक्स-रे मशीन नाही, सोनोग्राफी साठी खाजगी केंद्रात जावे लागते. या रुग्णालयात सेवा मिळत नसल्याने नागरिकांना खासगी अथवा नागपूर येथील महागड्या रुग्णालयात जावे लागत आहे. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या हे शक्य होत नाही. यामुळे त्यांच्यासमोर काय करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यास येथे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे वास्तव आहे. हीच अवस्था वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाची आहे. तेथे मंजूर तीन डॉक्टर पैकी तीन ही जागा रिक्त आहे. जि. प. अंतर्गत अल्लीपूर, कानगांव, बुरकोनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा पैकी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ पदेवर्धेलगत सावंगी येथील जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय व सेवाग्रामचे कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालय असताना जिल्हा रुग्णालयात ३१ डॉक्टर पूर्ण क्षमतेने रुग्ण सेवा देत आहे. त्यामुळे हिंगणघाटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनमानसात वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी आहे. हिंगणघाटचा बॅकलॉग भरावा राज्यातील आत्महत्याग्रस्त १० जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून ४१२ डॉक्टरांच्या एक महिन्यापूर्वी मुलाखती घेण्यात आल्या. ते शासनाकडून मिळणाऱ्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी २६ डॉक्टर वर्धा जिल्ह्यासाठी मिळणार असल्याने अधिकाधिक वैद्यकीय अधिकारी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालय व वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्याची मागणी आहे.