शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

रात्री ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांची ताटकळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:51 IST

आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले.

ठळक मुद्दे५ वाजताच्या बसला ४ तास विलंब : संतप्त विद्यार्थ्यांचे बसस्थानकावर आंदोलन

ऑनलाईन लोकमत आष्टी (श.) : आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आष्टी बसस्थानकावर आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर बस रवाना झाली.ग्रामीण भागातून तालुकास्थळी शिक्षणासाठी गोरगरिबांची मुले-मुली येतात; पण बस वेळेवर येत नाही. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. शाळा सुटल्यानंतर आबाद किन्ही, मोई, मुबारकपूर या तीनही गावातील ४८ विद्यार्थी बसस्थानकावर आले. काळोख होताच येथील समस्यांनी जाणीव करून दिली. स्थानकावर प्रकाशव्यवस्था नाही. महिलांकरिता शौचायल नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. डासांचा प्रादुर्भाव आहे. या विपरित परिस्थितीत विद्यार्थी आतुरतेने बसची प्रतीक्षा करीत होते.७ वाजले तरी बस न आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. याबाबत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी उपमुख्याध्यापक सय्यद अली यांना पाठविले. वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यानंतर रात्री ९.३० वाजता बस आली. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर बस गावाकडे निघाली. आर्वी व तळेगाव आगार व्यवस्थापक अरेरावीची भाषा वापरत आहे. भंगार बस आहे, येण्यास वेळ लोगतो, आम्ही काय करणार, अशी उत्तरे दिली जातात. या बेजबाबदार अधिकाºयांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी गौरी बिटणे, ऋतिका घुले, वैष्णवी खंडाते, पूर्वी कदम, दीक्षा चव्हाण, शीतल राठोड, वैष्णवी कोडापे, रसिका धुर्वे, निकीता राठोड, अर्पिता कोडापे, मृणाली यमगवळी, सुरेखा राठोड आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी