शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाहित विद्युत तारांच्या स्पर्शाने विद्यार्थी गतप्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:05 IST

विद्युत खांबात वीज प्रवाहित झाली. याच खांबाला लागून असलेल्या प्रवाहित विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे घडली.

ठळक मुद्देगिरोली येथील घटना : एक शेळीही दगावली

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली/झडशी : विद्युत खांबात वीज प्रवाहित झाली. याच खांबाला लागून असलेल्या प्रवाहित विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे घडली. शिवाय याच खांबाला स्पर्श झाल्याने एका शेळीचाही मृत्यू झाला. आदित्य अनिल ढगे रा. गिरोली (ढगे) असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी नुकताच त्याचा दहाव्या वर्गाचा निकाल लागला. यात तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता.आदित्य ढगे हा घटनेच्या दिवशी चंदू सुटे यांच्या शेतात रोजंदारीने कपाशीची लागवड करण्यासाठी गेला होता. सर्व मजूर वेळीच पोहोचले. पण आपल्याला येण्यास उशीर झाल्याचे लक्षात येताच तो घाई गडबडीने सुटे यांच्या शेतात जात होता. दरम्यान धुऱ्यावर असलेल्या विद्युत प्रवाहीत तारांला त्याचा स्पर्श झाला. सदर प्रकार इतर शेतमजुरांच्या लक्षात येताच त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याच घटनेदरम्यान ज्या विद्युत खांबात विद्युत प्रवाहित झाली व त्याला गुंडाळून असलेल्या ताराचा स्पर्श आदित्यला झाला त्याच ताराच्या स्पर्शाने एका शेळीचाही मृत्यू झाल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. शेळी दगावल्याने क्षीरसमुद्र येथील शेळीपालक गणेश मुंगले यांचे सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले आहे. आदित्यच्या मृत्यूसह शेळीपालक मुंगले यांच्या नुकसानीला महावितरणच्या अधिकाºयांचे दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून मृतकाच्या कुटुंबियांना व शेळीपालकाला महावितरणने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू