शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींचा ठिय्या

By admin | Updated: July 17, 2014 00:14 IST

शाळांचे सत्र सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही तालुक्यातील विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे पासेस देण्यात आलेल्या नाहीत़ यामुळे शैक्षणिक भवितव्यच

पासेसचा मुद्दा ऐरणीवर : बांधकाम विभागालाही ठोकले कुलूपआर्वी : शाळांचे सत्र सुरू होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे़ अद्यापही तालुक्यातील विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाद्वारे पासेस देण्यात आलेल्या नाहीत़ यामुळे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले़ पासेस त्वरित देण्याच्या मागणीसाठी बुधवारी विद्यर्थिनींनी उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केले़ अचानक झालेल्या आंदोलनामुळे परिवहनच्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली़ बसेस अडकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता़राज्य परिवहन महामंडळाद्वारे इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या शालेय विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर या योजनेंतर्गत मोफत प्रवास पासेस दिल्या जातात़ शालेय सत्र सुरू होऊन पंधरावडा उलटला; पण अद्यापही पासेस देण्यात आल्या नाहीत़ यामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाताना अडचण व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे़ या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या जि.प. कन्या, गांधी विद्यालय, कृषक व इतर शाळांत शिक्षणासाठी येणाऱ्या तालुक्यातील सुमारे २०० विद्यार्थिनींनी बसस्थानक परिसरात ठिय्या आंदोलन केले़ भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात दुपारी १ वाजता बस निघण्याच्या मार्गावरच ठिय्या आंदोलन करण्यात आल्याने सर्वच बसेस अडकल्या होत्या़ आर्वीतील जि.प. कन्या शाळा, गांधी विद्यालय, कृषक विद्यालय तसेच तालुक्यातून अन्य शाळांत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना त्वरित पासेस देण्यात याव्या, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली़ आंदोलक पदाधिकारी उग्र झाल्याने काही काळ तणावही निर्माण झाला होता़ अखेर आगार व्यवस्थापकांनी पासेस त्वरित देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.दोन्ही आंदोलनांमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळा नांदुरकर, मनोज कसर, प्रशांत ठाकूर, संजय थोरात, संजय राऊत, प्रफूल काळे, राजाभाऊ गिरधर, प्रकाश गुल्हाणे, सूर्यप्रकाश भट्टड, सागर सारसर, विजय वाजपेयी, धनंजय घाटनासे, मिलिंद हिवाळे, मथुरेश पुरोहित, मनोज वर्मा, रणजीत घोडमारे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घेतला़(तालुका प्रतिनिधी)