वर्धा : शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैगिक शोषण होत असल्याचा प्रकार जिल्हा परिषदेच्या दहेगाव (धांदे) येथील उच्च प्राथमिक शाळेत उघड झाला आहे. या शिक्षकाने शाळेतील सातव्या वर्गातील एका मुलीचे गत वर्षभरापासून तर दुसऱ्या मुलीचे या वर्षापासून लैगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुख्याध्यापिका व त्यांच्या पालकांना दिल्याने गुरुवारी पुलगाव पोलिसात तक्रार करण्यात आली. सदर शिक्षकावर जि.प. प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे.प्राप्त माहितीनुसार, देवळी तालुक्यांतर्गत येत असलेल्या दहेगाव (धांदे) येथे जिल्हा परिषदेची पाच शिक्षकी उच्च प्राथमिक शाळा आहे. याच शाळेत असलेल्या मंगेश शेराम नामक शिक्षक आहे. या शिक्षकाने हिंगणघाट येथे झालेल्या क्रीडा संमेलनात विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. यावेळी मंगेशने धमकावल्यावरून तिने विरोध केला नाही. हिंमत वाढल्याने त्या शिक्षकाने याने दुसऱ्या विद्यार्थिनीलाही आपल्या जाळ्यात ओढले. या दोन्ही विद्यार्थिनीचे हा गत दीड वर्षांपासून लैगिक शोषण करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २३ जानेवारी रोजी शाळेत बाहेरच्या शाळेतील दोन शिक्षकांना बदली शिक्षक म्हणून पाठविण्यात आले. यावेळी एका शिक्षिकेने ‘सत्यमेव जयते’बाबत माहिती दिली. यावरून विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका ललिता शुक्ला यांना प्रकाराची माहिती देताच या प्रकाराचा उलगडा झाला. या प्रकरणाची तक्रार करण्याकरिता विद्यार्थिनींचे पालक पुलगाव पोलिसात गेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.(प्रतिनिधी)
शिक्षकाकडून विद्यार्थिनींंचे लैंगिक शोषण
By admin | Updated: January 29, 2015 23:11 IST