शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मिळतोय अत्यल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे.

ठळक मुद्देवर्धा विभागातील पाच आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त : १५०० कर्मचारी कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ५० वर्षांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्वेच्छानिवृत्तीसाठी आतापावेतो केवळ चारच अर्ज प्राप्त झाले आहेत.  राज्यातील २७ हजार कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील, असा अंदाज एस.टी. महामंडळाने व्यक्त केला होता. त्यासाठी २४ डिसेंबर ही अंतिम मुदतही ठेवली होती. मात्र, अत्यल्प अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे समजते. आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे. वर्धा विभागांतर्गत  वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत), हिंगणघाट, आदी पाच आगारे आहेत. या संपूर्ण आगारांत २४० बसगाड्या आहेत; तर १५००च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी आणि कामगार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या  वेतनावर महिन्याकाठी २.२५ ते अडीच कोटी इतका खर्च होतो. राज्यातील २७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुढाकार घेतला तर वेतनासाठीचे दरमहा १०३ कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्तीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र, वैयक्तिक माहितीपत्र मागविण्यात आले होते. मात्र,  वर्धा विभागांतर्गतच्या पाचही आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.

वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २.२५ कोटी रुपये खर्च होतात.

अर्ज सादर करण्यास मिळणार मुदतवाढ या येजनेसाठी निवृत्ती घेणार्या कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत नेमक्या निधीची मागणी करता येत नाही. महामंडळाने कर्मचार्यांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली असून अर्ज सादरीकरणाला मुदतवाढ मिळणार असल्याचे समजते. 

टॅग्स :state transportएसटी