शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह पोस्टमुळे आंजीत तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 22:03 IST

येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.

ठळक मुद्देनिषेधार्थ बाजारपेठ बंद : खरांगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. याच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवून खरांगणा (मोरांगणा) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी डॉ. कांबळे यांना ताब्यात घेतले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी मंगळवारी फेबसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने आंजीसह परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे रात्रीच काहींनी आंजी येथील त्यांच्या दवाखान्याची तसेच येळाकेळीजवळ वाहनाचीही तोडफोड केली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी सर्व दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. रामजन्म उत्सव समितीचे मनोजकुमार गुप्ता यांच्यासह सहकाऱ्यांनी खरांगणा पोलीस स्टेशनमध्ये डॉ. कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. कांबळे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शहा व पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी करीत आहे. आंजीत सकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याने तणावाची स्थिती कायम होती. या सभेत सरपंच जगदीश संचेरिया, भाजपाचे महामंत्री सुनील गफाट, सुनील भांदक्कर, सतिश पवार, अमोल भिवगडे व रामंचद्र बालपांडे आदी उपस्थित होते. यावेळी पुलगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांनीही भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.

टॅग्स :Policeपोलिस