शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:59 IST

भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देपाच दिवसांत कारवाईची ग्वाही

ऑनलाईन लोकमत समुद्रपूर : भारनियमन रद्द करा, कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल भाव द्या, या मागण्यांसाठी बुधवारी दुपारी १२ वाजता येथील विद्याविकास महाविद्यालय ते झेंडा चौक मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. पाच दिवसांत कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याने शेतकरी व मनसेने आंदोलन मागे घेतले.शेतकºयांच्या समस्यांबाबत एक महिन्यापासून मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी आंदोलनाची भूमिका घेतली होती. याबाबत प्रशासनाला इशारा देण्यात आला होता. कृषी पंपाचे भारनियमन १२ ते १६ तास असल्याने शेतकरी त्रस्त आहे. रात्री बेरात्री ओलितासाठी जाणे जीवावर बेतणारे आहे. शेतकºयांच्या जीवितास धोका झाला तर जबाबदार कोण, असा प्रश्न मनसेने आंदोलनात उपस्थित केला. महाराष्ट्रात आणि विशेषत: विदर्भात मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती होते. मग, भारनियमन का, असा प्रश्नही मनसेने मांडला. महावितरणचे अभियंता व तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी येत आश्वासन दिल्यास आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका घेतली. यामुळे उपअभियंता व तहसीलदार यांनी आंदोलनस्थळ गाठत मागण्यांचे समर्थन केले. पाच दिवसाच्या आत हे प्रश्न मार्गी लागतील, अशी ग्वाही दिली. यानंतर रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अमोल बोरकर, सुभाष चौधरी, मनोज गिरडे, किशोर चांभारे, रमेश घंगारे, प्रवीण श्रीवास्तव, सुनील भुते, राहुल सोरटे, जयंत कातरकर, अनिल आडकीने, वासुदेव वैरागडे, कवडु ब्राह्मणे, अक्षर पठाण, गोविंदा येडे, नत्थूजी गुळघाने, राहुल घुसे, प्रवीण वाघमारे, राजू मते, अनिल क्षीरसागर, निलेश खाटीक, संदीप शिवणकर, प्रदीप बुरिले, बंडु मून, अतुल चंदनखेडे, विष्णू कारामोरे, विशाल जयराज, बंटी जयराज, शुभम पेटकर, विशाल मखरे, प्रविण वाघमारे, सावरकर यासह शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी