गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 12:30 AM2018-09-06T00:30:08+5:302018-09-06T00:31:46+5:30

जिल्ह्यात गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीला आळा घालण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा मोटर मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Stop overload traffic from secondary minerals | गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक थांबवा

गौण खनिजाची ओव्हरलोड वाहतूक थांबवा

Next
ठळक मुद्देमागणी : जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीला आळा घालण्यात यावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा मोटर मालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना देण्यात आले.
खदानींमधून अनेक वाहने रॉयल्टीविना चालतात. त्यातील निवडक वाहनांना अधिकाºयांकडून अभय दिले जाते. सामान्य गाडीमालकास मात्र वाजवीपेक्षा जास्त दंड आकारण्यात येतो. बरेचदा सामान्य गाडीमालकास रॉयल्टी असताना देखील दंड केला जातो. अधिकाºयांनी वाळूघाटांतून वाळू जप्त केले. पण, अनेकांनी वाळूची उचल केल्याने गरीब गाडीमालकांना काम न मिळाल्याने नुकसान झाले आहे. घाटमालकांनी याचा फायदा घेत बाजारभावापेक्षा जास्त दराने वाळूची विक्री सुरु केली आहे. जिल्ह्यात ओव्हरलोडींगची समस्या कायम आहे. यासंदर्भात आरटीओंची भेट घेतली. परंतु रॉयल्टीप्रमाणेच यामध्येही भेदभाव केला जात आहे. मोठ्या गाडीमालकांना सोडून सामान्य गाडीमालकास वाजवीपेक्षा जास्त दंड आकारला जातो. ओव्हरलोडींग वाहतुकीमुळे सर्वसामान्य गाडीमालकांचे अतोनात नुकसान होत आहे. शासनाने खदानींवर नाका बसविला असला तरी विना रॉयल्टी गाडी जावू देऊ नये. बहुतांश सामान्य गाडीमालकांनी जीपीएस लावले आहे. तरीही त्यांच्यावर अन्यायच केला जात आहे. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना मोटर मालक संघटनेचे अताउल्ला खॉ पठाण, प्रमोद भोंगाडे, भास्कर चोपडे, दिलीप नाईक, दिनेश भगत, राजू नेहारे, नामदेव कोडगिलवार, अंकुश डफरे, नीलेश जऊळकर, प्रेम लोखंडे, पंकज लोणकर, अमोल रामटेके, विपीन पांडे, गौरव पाटील, भुषण सुरकार, शैलेश मानकर, सचिन तागडे यांच्यासह संटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Stop overload traffic from secondary minerals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.