शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

रेशनकार्डसाठी तहसीलमध्ये ठिय्या

By admin | Updated: January 25, 2017 01:03 IST

शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी,

वंचित ग्रामस्थांचे आंदोलन : जमीन नाही तर सातबारा आणणार कुठून वर्धा : शासनाने केसरी कार्ड धारकांना स्वस्त धान्य देणे बंद केले आहे. केवळ जमिनीचा सातबारा असल्यासह केशरी शिधापत्रिका देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय जुन्या शिधापत्रिकाही बाद ठरविल्या आहे. परिणामी, सातबारा नसलेल्या नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. याविरूद्ध कुरझडी (जामठा) येथील वंचित ग्रामस्थांनी मंगळवारी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या प्रसंगी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. केंद्र शासनाने केशरी कार्डधारक नागरिकांचा धान्य पुरवठा बंद केला. समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; पण अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्या योजनांचा गरजूंना लाभ मिळत नाही. आता शासनाच्या अजब निर्णयाचा गोरगरीब नागरिकांना फटका बसत आहे. शासनाने जमीन व सातबारा तसेच अपंगत्व असेल तरच केशरी शिधापत्रिका मिळतील, असा वटहुकूमच जारी केला आहे. या प्रकारामुळे गोरगरीब, भूमीहीन, हातावर आणून पानावर खाणाऱ्या नागरिकांना जगणे स्वस्त धान्य मिळेणासे झाले आहे. जुने कार्ड बाद केले असून नवीन कार्डही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहे. कुरझडी येथील सुमारे ३० ते ४० गरजू कुटुंबियांकडे जुन्या शिधापत्रिका आहे; पण त्यांना सातबारा नसल्याने नवीन शिधापत्रिका मिळत नाहीत. यामुळे ते शासनाच्या स्वस्त धान्य योजनेपासून वंचित आहेत. दुर्बल घटकांना सवलतीच्या दरात धान्यसाठा मिळणे क्रमप्राप्त आहे. स्वस्त धान्य दुकानदारास विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. या प्रकरणी योग्य कार्यवाही करीत कुरझडी (जामठा) येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. शोषित जनआंदोलन आझाद युवा संघटन व ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनता प्रवीण ढाले, दिनबाजी उघडे, नरेश चौधरी, सुरेश सोनटक्के, दशरथ राठोड, गलांडे, सुलोचना नलांडे यासह ग्रामस्थांनी सहभाग घेत व्यथा मांडल्या.(कार्यालय प्रतिनिधी) केशरी कार्डधारकांना सरसकट वगळणे अयोग्य केशरी, शुभ्र आणि पिवळे अशा तीन प्रकारच्या शिधापत्रिका शासनाकडून जारी केल्या जातात. शुभ्र रेशन कार्ड अंत्योदय, पिवळे बीपीएल तर केशरी कार्ड एपीएल धारकांना दिले जात होते. यातील बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नवीन कार्ड व धान्य साठा सुरळीत दिला जात आहे; पण एपीएल कार्ड धारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. आता तर गरीब असो वा नसो, सातबारा असेल वा अपंगत्व असेल तरच केशरी कार्ड व धान्य दिले जाईल, असा अफलातून निर्णय घेतला असून तो अयोग्य आहे.