शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पोटाची भूक सूर्यापेक्षाही ‘फायर’; कामगारांचे ‘झुकेगा नही साला’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

जिल्ह्यात हातमजुरी करून जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या शोधार्थ जिल्ह्याबाहेरील अनेक कष्टकरी वर्ध्यात येतात. त्यामुळे काम मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होते. या स्पर्धेत टिकून राहून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूर आणि कामगार आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधून भर उन्हातच अंगमेहनतीची विविध कामे करतात.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, यंदाच्या वर्षी ४६.५ अंशापर्यंत तापमानाने उच्चांक गाठल्याचे वास्तव आहे. अशाही परिस्थितीत तप्त उन्हाची तमा न बाळगता कामगार आणि मजूर ‘झुकेगा नही साला’ असेच काहीसे म्हणत केवळ डोक्याला दुपट्टा बांधून पोटाची खळगी भरण्यासाठी राबताना दिसतात.जिल्ह्यात हातमजुरी करून जगणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इतकेच नव्हे तर रोजगाराच्या शोधार्थ जिल्ह्याबाहेरील अनेक कष्टकरी वर्ध्यात येतात. त्यामुळे काम मिळविण्यासाठी चांगलीच स्पर्धा होते. या स्पर्धेत टिकून राहून आपले व आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी मजूर आणि कामगार आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधून भर उन्हातच अंगमेहनतीची विविध कामे करतात. त्यांच्या या कामाच्या मोबदल्यात त्यांना पैसे मिळत असले तरी त्यांच्या तप्त उन्हातील श्रमाच्या तुलनेत ते कमीच असल्याची खंतही अनेक मजूर व कामगार व्यक्त करतात.विशेष म्हणजे शिक्षणाच्या जोरावर अनेक व्यक्ती अधिकारी बनून वातानुकूलीत कक्षात बसून कामे करतात; पण याही अधिकाऱ्यांकडून काही वेळा श्रमाचा मोबदला देताना या कष्टकऱ्यांची बोळवण केली जात असल्याचे सांगण्यात आले. सध्या महागाई चांगलाच उच्चांक गाढत आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका कष्टकऱ्यांना सोसावा लागत आहे. शासनानेही महागाई नियंत्रणासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज आहे.

पारा ४३ अंशांवर - नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात तापमानाने ४६.४ अंश सेल्सिअस इतका उच्चांक गाठला. तर अजूनही जिल्ह्याचे उष्णतामान जास्तच आहे. एकूणच जीवाची काहिली होईल, असे ऊन सध्या जिल्ह्यात असल्याने प्रत्येकाने दक्ष राहण्याची गरज आहे.

उन्हात काम करताय, ही घ्या काळजी 

उन्हात काम करणाऱ्या व्यक्तीने उष्माघाताचा बळी ठरू नये म्हणून डोक्याला दुपट्टा किंवा रुमाल बांधला पाहिजे. जमेपर्यंत सावलीत विविध कामे करावी. इतकेच नव्हे तर उन्हात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे, असे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात.

ऊन-सावली आमच्यासाठी एकचदैनंदिन व्यवहार चालविण्यासाठी तसेच कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता दररोज कामावर जावे लागते. माझ्या कुटुंबात  कमावणारे हात दोन आहेत. तर खाणारे हात दहा  असल्याने माझ्यासारख्याच्या हाताला दररोज काम मिळणे गरजेचे आहे.- श्रावण नेहारे, गवंडी कामगार.

महागाईच्या तुलनेत मोबदला कमी हल्ली उन्हाळवाहीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. काडीकचरा वेचणीला सुरुवात झाली आहे; पण महागाईच्या तुलनेत पाहिजे त्या प्रमाणात मजुरी मिळत नाही. आमच्या कुटुंबात एकूण सात सदस्य आहेत. केवळ दोघे कमावते आहो. यामुळे उन्हाचे चटके सहन करून काम करावेच लागते.- सुनंदा बिरे, मजूर.

उदरनिर्वाहासाठी काम गरजेचेशेतीचे कामे ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगताच करावे लागते. हल्ली बैलजोडीच्या सहाय्याने वखरवाही करीत आहे. मान्सून लवकर येणार असल्याने आग ओकणाऱ्या सूर्याची पर्वा न करता शेतीची कामे करीत आहे. माझ्या घरात पाच सदस्य असून, त्यातील मी एकटाच कमावता आहे. यामुळे मी महिनेवारीने शेतमजुरीची कामे करतो.- चरणदास कुमरे, शेतमजूर.

 

टॅग्स :TemperatureतापमानFarmerशेतकरी