मे हिटनंतर वर्धेकर अनुभवताहेत जून हिटचा तडाखावर्धा : संपूर्ण मे महिना सूर्य आग ओकत राहिला. ढगाळ वातावरणामुळे दोन ते तीन दिवस संपूर्ण महिनाभर तापमान ४० ते ४५ च्या दरम्यान होते. एवढेच नव्हे तर दोन दिवस तापमान ४६ वर पोहोचले होते. अद्यापही तापमानाची चाळीशी उतरलेली नाही. त्यामुळे मे हिटनंतर वर्धेकरांना आता जून हिटचा तडाखा सोसावा लागत आहे. जिल्ह्यात उष्णतेचा आगडोंब उसळलेला आहे. संपूर्ण महिनाभर दिवसाचे तापमान अपवाद वगळता ४० ते ४५ अंशादरम्यान होते. त्यामुळे अंगाची लाहीलाही झाली. उष्णतेची तीवता अद्यापही कमी झालेली नाही. आजही दिवसा फिरताना नागरिकांचा जीव कासाविस होत आहे. त्यामुळे शक्य होईला तेवढे नागरिक उन्हापासून बचावासाठी बाहेर जाण्याचे टाळत आहे. संपूर्ण मे महिन्याच्या एकंदारित तापमानाचा आढावा घेतला असता सातत्याने २३ दिवस तापमान हे ४१ ते ४२ अंशाच्या घरात होते. यामुळे दुपारी वाहणारे उष्णवारे सर्वांना बेजार करीत होते. डोक्याला रूमाल बांधल्याशिवाय कुणाही आजही बाहेर निघायला तयार नाही. त्यातच सातत्याने चार ते पाच दिवस तापमान ४५ अंशावर खेळत होते. त्यामुळे तर शहरात फिरताना भट्टी पेटली की काय असाच अनुभव येत असल्याचे नागरिक सांगत होते. मध्यंतरी ७ आणि ८ मे दरम्यान आलेल्या ढगाळ वातावरणामुळे दोन दिवस तापमान अचानक ३६ अंशावर आले. यामुळे ही दोन दिवस काहीशी सुखावणारी होती. पण त्यानंतर तापमानाने घेतलेली उचल अद्यापही कमी झालेली नाही. सध्या जून महिना सुरू झालेला नाहे. तरीही तापमान ४० अंशाच्यआ खाली यायला तयार नाही. परिणामी मे हिटनंतर आता जून हिटचा तडाखा सोसावा लागत असल्याचे बोलल्या जात आहे. ढग जमा होत असल्याने नागरिकांना पाऊस येण्याच्या आशा आहेत. (शहर प्रतिनिधी)सहा दिवस उन्हाचा पारा ४५ अंशावरमे महिन्यात जिल्ह्याचा पारा तब्बल सहा दिवस ४५ अंशावर होता. यामध्ये १५ आणि २१ मे या दोन दिवशी तापमान ४५.५ अंशावर होते, तर १६ मे रोजी ४५.२ आणि १७, १९ आणि २३ या तीन दिवशी तापमान ४५ अंशावर होते. त्यामुळे ही पाच दिवस नागरिकांना बेहाल करणारी ठरली. या दिवसात नागरिकांच्या जीवाची लाही लाही झाली.दोन दिवस पारा ४६ अंशावरतापमान सातत्याने ४५ अंशावर असतानाच १८ मे रोजी यात वाढ होऊन पारा ४६ अंशावर पोहोचला. त्यामुळे उन्हात गेल्यावर आपली कातडी जळते की काय, असाच अनुभव वर्धेकरांना आला. या दिवशी वर्धेचे तापमान हे महाराष्ट्रात सर्वाधिक होते. ही दाहकता अनुभवत असतानाच तीन दिवसाच्या फरकाने २२ मे रोजी तापमान ४६.१ अंशावर पोहोचले. यामुळे तर नागरिक आणखीनच बेजार झाले होते. ज्या काळात पारा ४६ अंशावर पोहोचला त्या काळात जिल्ह्यासह राज्यात उष्णतेची लाट असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांना या दिवसात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आता प्रतीक्षा केवळ पावसाचीवाढलेले तापमान अजूनही ४० अंशाच्या च्या खाली घसरायला तयार नाही. रोजची ऊन्ह पाहता ते कमी होईल याची चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आता पाऊसच पडायला हवा तरच तापमान कमी होईल, असे बोलले जात आहे.
तापमानाच्या चाळीशीने लाहीलाही
By admin | Updated: June 2, 2016 00:43 IST