शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
3
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
4
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
5
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
6
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
7
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
8
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
9
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
10
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
13
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
14
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
15
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
16
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
17
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
18
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
19
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
20
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश

राज्य परिवहन महामंडळाचा ‘अश्वमेध’ प्रवाशाविना

By admin | Updated: November 19, 2016 01:10 IST

बिनावाहक, बिना थांबा अशी सुविधा परिवहन महामंडळाने या पूर्वी आणली. पण बिनाप्रवाशी एस.टी.बस पाहून

महिन्याकाठी लाखोंचा चुना : वातानुकुलित बसला अत्यल्प प्रतिसादअरुण फाळके  कारंजा (घाडगे)बिनावाहक, बिना थांबा अशी सुविधा परिवहन महामंडळाने या पूर्वी आणली. पण बिनाप्रवाशी एस.टी.बस पाहून अनेकांना आता परिवहन महामंडळाने प्रवाशाविना एसटी बस अशी संकल्पला अंमलात आणली काय असे वाटू लागले आहे. खासगी लक्झरी बसच्या अवैध वाहतुकीवर तोडगा काढण्याकरिता म्हणून परिवहन महामंडळाने पुणे-चंद्रपूर अशी वातानुकुलीत व्हॉल्वो बससेवा सुरू केली. या बसला ‘अश्वमेघ’ असे नाव दिले. या आकर्षक व महागड्या बसमध्ये औरगांबादनंतर प्रवासी नसतात. बस अक्षरश: बिना प्रवासी धावत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. यामुळे या बसफेरीवर होत असलेला खर्च एका चालकाच्या व वाहकावर आणि डिझेलवरच होत असल्याचे बोलले जात आहे. नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचा आरामशीर प्रवास व्हावा आणि खासगी ट्रॅव्हल्सकडे जाणारा प्रवासी परिवहन महामंडळाच्या बससेवेकडे आकर्षीत व्हावा या उद्देशाने गत सहा महिन्यांपासून ही वातानूकुलीत बससेवा ‘अश्वमेध’ नावाने सुरू केली. अशीच एक बस पुणे-चंद्रपूर या नावाने गत तीन महिन्यांपासून सुरू आहे. ही बस पुण्यावरून सकाळी ६.३० वाजता निघते तर चंद्रपूरवरून सायंकाळी ७ वाजताची तिची वेळ आहे. बसमध्ये ५१ आसन आहेत. सिट्स आरामदायी व आकर्षक आहेत. या बसने पुणे ते चंद्रपूर या प्रवासाला १८ तासांचा कालावधी लागतो. या बसची टिकीट एक्सप्रेस बसेस पेक्षा दुप्पट आहे. चंद्रपूरचे तिकीट १९०० रुपये आहे. या अवाढव्य तिकीट दरामुळे औरगांबाद नंतर या बसला प्रवाशी मिळत नसल्याचे दिसून आले आहे. परतीच्या प्रवासात ही बस राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कारंजा येथील बसस्थानकावर पोहोचली असता या बसमध्ये अमरावती येथून नागपूरला जाण्याकरिता केवळ एकमेव प्रवाशी असल्याचे दिसून आले आहे. औरगांबाद ते अमरावती या प्रवासात या बसमध्ये केवळ तीन प्रवासी बसले असल्याची माहिती वाहकाने दिली. लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या नावावर परिवहन महामंडळाच्यावतीने लाखोंचा तोटा सहन केल्या जात आहे. तर दुसरीकडे ज्या लाल गाड्यांना ग्राहक आहे त्यावर कुठलाही खर्च महामंडळाच्यावतीने केल्या जात नाही. ग्रामीण भागात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याच जुन्या आणि खिळखिळ्या बसमधूनच प्रवास करावा लागतो आहे. या बसगाड्या रस्त्यात कुठेही बंद पडतात. याकडे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. महिन्याकाठी सरासरी साडेबारा लाखांचा तोटा या बसमध्ये असलेल्या दोन चालकांचा मासीक पगार अंदाजे एक लाख रुपये, वाहकाचा पगार ५० हजार तर पुणे ते चंद्रपूर वाहतुकीसाठी ४५ हजार रुपयांचे ७०० लिटर लागते. बसची किंमत आणि व्यवस्थापनाचा खर्च वेगळा. याचा हिशेब काढल्यास महिन्याकाठी १५ लाख रुपयांचे डिझल, २ लाखांचा व्यवस्थापन खर्च आणि दीड लाखांचा कर्मचारी खर्च याप्रमाणे एकूण १८ लाख ५० हजारांचा खर्च महिन्याकाठी या बसवर होत आहे. मिळकत मात्र महिन्याकाठी पाच लाखाचीही नाही. म्हणजे दर महिन्याला साडेबारा लाख रुपयांचा तोटा या एका बससाठी महामंडळाला होत आहे. याकडे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.