शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शहर उपक्रमाला सुरुवात

By admin | Updated: June 19, 2017 01:10 IST

पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने जलयुक्त शहर ही संकल्पना साकार करण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे.

खुल्या मैदानात जलसंधारण : पर्यावरणस्नेही संस्था व नागरिकांचे श्रमदानलोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने जलयुक्त शहर ही संकल्पना साकार करण्यासाठी श्रमदान करण्यात येत आहे. या माध्यमातून शहरातील पाच मोठ्या मैदानामध्ये जलसंधारणाकरिता चर खोदण्यात आले. नागरिकांनी श्रमदान करुन या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संत तुकडोजी वॉर्डात प्रत्येक उन्हाळ्यात पाणीटंचाई भासते. कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण संवर्धन संस्थेने पुढाकार घेत शहरात ठिकठिकाणी सभा, मार्गदर्शन शिबिर घेऊन नागरिकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले. श्रमदान करण्याचे आवाहन केले. प्राध्यापक कॉलनीतील दोन मैदान, रिठे कॉलनीतील दोन, सहजीवन सोसायटी येथील एक अशा पाच मैदानांवर दहा बाय दहा आकाराचे चर खोदण्यात आले. नागरिकांच्या सहभागातून राबविलेल्या उपक्रमाला गिरिधर राठी, अशोक चंदनखेडे यांनी सहकार्य केले. प्राध्यापक कॉलनीत प्रा. ज्ञानेश्वर खडसे, रिठे कॉलनीत नितीन सुकळकर, प्रा. कारामोरे, चंदु उताणे, सहजीवन सोसायटीत प्रा. घंगारे, गिरिधर काचोळे यांनी पुढाकार घेत श्रमदानाचे कार्य पार पाडले. आशिष भोयर, प्रदीप गिरडे, अभिजित डाखोरे, रमेश झाडे, हेमंत हिवरकर, छत्रपती भोयर, नितीन शिंगरु, राजेंद्र कोंडावार, ज्ञानेश्वर चौधरी, रामकृष्ण बोडे आदींनी सहकार्य केले.