शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रमणध्वनी लोक अदालतच्या फिरत्या विधी सेवेला प्रारंभ

By admin | Updated: July 3, 2016 02:10 IST

महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई तथा विधी सेवा उपसमिती उच्च न्यायालय नागपूर आणि जिल्हा विधी सेववा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने

न्यायासाठी उपक्रम : ३० दिवस शिबिरवर्धा : महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई तथा विधी सेवा उपसमिती उच्च न्यायालय नागपूर आणि जिल्हा विधी सेववा प्राधिकरण वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने फिरते लोक अदालत आणि विधी सेवा शिबिर १ ते ३१ जुलै दरम्यान घेण्यात येत आहे. शुक्रवारी या शिबिराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.शासनाच्या फिरते लोक अदालत आणि विधी सेवा शिबिरांतर्गत पक्षकारांना न्याय त्यांच्या दारात मोबाईलव्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. मोबाईल व्हॅन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. यात आर्वी १ ते ४ जुलै, आष्टी ५ ते ८ जुलै, कारंजा (घा.) ९ ते ११ जुलै, वर्धा १२ ते १५ जुलै, सेलू १६ ते १९ जुलै, पुलगाव २० ते २३ जुलै, हिंगणघाट २४ ते २७ जुलै, समुद्रपूर २८ ते ३१ जुलैपर्यंत मोबाईल व्हॅनद्वारे लोक अदालत शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात अधिकाधिक पक्षकारांनी आपली प्रकरणे आपसी तडाजोडीने निकाली लावून घेत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्या. रायकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश मु.द. चांदेकर, म.र. पुरवार, स.वि. खोंगले, अं.शे. खडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर सु.ना. राजूरकर, सर्व दिवाणी न्यायाधीश, न्यायालयीन व्यवस्थापक पिंपळे, प्रबंधक बाकडे, प्राधिकरण व जिल्हा न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)